पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेला संशयीत आरोपी विक्रम भावे याला बॉम्बस्फोटप्रकरणी १० वर्षाची शिक्षा झाली असून डॉ़ दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने त्याने रेकी केली होती. त्यामुळे त्याला निष्पाप म्हणणे चुकीचे असून त्याचा जामीन अर्ज फेटाळावा, असा युक्तीवाद सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी सत्र न्यायाधीश आऱ एम़ पांडे यांच्या न्यायालयात केला़डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना पुरावा नष्ट करण्याचा सल्ला दिल्याच्या आरोपावरुन आरोपींचे वकील अॅड. संजीव पुनाळेकर यांना, तर डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंघाने रेकी केल्याच्या आरोपावरून विक्रम भावे याला सीबीआयने अटक केली होती.त्यानंतर पुनाळेकर यांना अटी-शर्तींवर जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर भावे याने देखील जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जाला सीबीआयचे वकील अॅड. सूर्यवंशी यांनी विरोध केला.
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 5:12 AM