सूचना, हरकतींवर २६ फेब्रुवारीला सुनावणी

By admin | Published: February 25, 2015 03:59 AM2015-02-25T03:59:39+5:302015-02-25T03:59:39+5:30

महापालिकेचे आरक्षण व प्रभाग रचनेविषयी २६ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे तब्बल २०५ हरकती आल्या असून सुनावणीसाठी फक्त चार तासांची वेळ देण्यात आली आहे.

Hearing on the notice, objections on February 26 | सूचना, हरकतींवर २६ फेब्रुवारीला सुनावणी

सूचना, हरकतींवर २६ फेब्रुवारीला सुनावणी

Next

नवी मुंबई : महापालिकेचे आरक्षण व प्रभाग रचनेविषयी २६ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे तब्बल २०५ हरकती आल्या असून सुनावणीसाठी फक्त चार तासांची वेळ देण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला आरक्षण व प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांकडून १० ते १८ फेब्रुवारी दरम्यान सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. यावेळी प्रभाग रचना व आरक्षणाविषयी सर्वच राजकीय पक्षांमध्ये नाराजी पसरली होती. तब्बल २०५ नागरिकांनी हरकती नोंदविल्या असून काँगे्रसने न्यायालयात धाव घेतली आहे. हरकतींवर २६ फेब्रुवारीला महापालिकेच्या मुख्यालयामध्ये सुनावणी होणार आहे. याविषयी सर्व तक्रारदारांना कळविण्यात आले आहे. ज्यांना त्यांच्या वेळेविषयी पत्र मिळाले नसेल त्यांनी महापालिकेच्या निवडणूक उपआयुक्तांच्या कार्यालयातून प्रत घ्यावी, असे आवाहन केले आहे.
सूचना व हरकतींवर ११ ते ३ वाजेदरम्यान सुनावणी होणार आहे. २४० मिनिटांमध्ये २०५ अर्ज निकाली काढले जाणार आहेत. यामुळे सरासरी एका अर्जदारास एक ते दीड मिनिट वेळ दिला जाणार आहे. निर्धारित वेळेवर कोणी उपस्थित राहिले नाही तर त्यांचा अर्ज एकतर्फी निकाली काढला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hearing on the notice, objections on February 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.