Join us

लोकशाही दिनानिमित्त १६ अर्जांवर सुनावणी, तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश

By सचिन लुंगसे | Published: February 14, 2024 3:36 AM

लोकशाही दिनाच्या निमित्ताने प्राप्त १६ अर्जांपैकी ११ अर्ज मुंबई मंडळाशी संबंधित होते. तर ४ अर्ज मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाशी व १ अर्ज कोंकण मंडळाशी संबंधित होते.

मुंबई : म्हाडा मुख्यालयात आयोजित लोकशाही दिनात म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी १६ अर्जदारांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित अर्जदारांच्या अर्जाबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. लोकशाही दिनाच्या निमित्ताने प्राप्त १६ अर्जांपैकी ११ अर्ज मुंबई मंडळाशी संबंधित होते. तर ४ अर्ज मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाशी व १ अर्ज कोंकण मंडळाशी संबंधित होते.

अर्जातील तक्रारींनुसार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह चर्चा करून संजीव जयस्वाल यांनी अर्जांवर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच अर्जांवर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल येत्या १५ दिवसांत देण्याचे आदेश दिले. लोकशाही दिनाला मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे, कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे, म्हाडाचे सचिव राजकुमार सागर, सहमुख्य अधिकारी उमेश वाघ, सहमुख्य अधिकारी नीलिमा धायगुडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :म्हाडामुंबई