Join us

परांजपे बंधूंच्या अटकपूर्व जामिनावर २९ जुलैला सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 6:29 AM

Paranjape Brothers : भूखंड घोटाळा प्रकरण : ५४५ पानांचे पुरावे सादर.

ठळक मुद्देभूखंड घोटाळा प्रकरण : ५४५ पानांचे पुरावे सादर.

पुण्यातील नामांकित बिल्डर परांजपे बंधू यांच्या विरोधात तक्रारदार वसुंधरा डोंगरे यांच्या वकिलाने शुक्रवारी दिंडोशी कोर्टात जवळपास ५४५ पानांचे पुरावे सादर केले. त्यामुळे परांजपे बंधूंच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता ती २९ जुलै रोजी होणार आहे.

शुक्रवारी डोंगरे यांचे वकील ॲड. जगदीश शिंगाडे यांनी परांजपे बंधूंविरोधात ५४५ पानी पुरावे सादर केले. त्यात त्यांनी लोकांची फसवणूक कशी केली, याबाबतच्या कागदपत्रांचा समावेश असल्याचे तक्रारदार डोंगरे यांनी सांगितले. डोंगरेंनी केलेल्या आरोपात तथ्य नसून विनाकारण जुन्याच प्रकरणात गुंतवून तसेच गुन्हा दाखल करून त्यांना त्रास दिला जात असल्याचा मूद्दा परांजपे यांचे वकील निरंजन मुंदरगी यांनी मांडला होता.

विलेपार्लेच्या एअरपोर्ट कॉलनीतील भूखंड अनधिकृतपणे वाढवून घेतल्याचा आरोप परांजपे बिल्डर व जयविजय सोसायटीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांविरोधात वसुंधरा डोंगरे यांनी केला आहे. त्यानुसार विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल करत श्रीकांत परांजपे आणि शशांक परांजपे यांना पुण्यातून ताब्यात घेतले होते.

कार्यपद्धती होणार उघड‘आम्ही शुक्रवारी पुण्यातील परांजपे बिल्डर विरुद्धच्या विलेपार्ले पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दिंडोशी कोर्टात फिर्यादींच्या वतीने हस्तक्षेप अर्ज व त्यांचे म्हणणे मांडले आहे. त्याच्या पहिल्या ४५ पानांत फिर्यादीने अनेक गोष्टींचा उलगडा करत आरोपींची विविध प्रकरणातील कार्यपद्धती दर्शविणारी कागदपत्रे पुरावा म्हणून जोडली आहेत. ज्यात एकूण १०६ दस्त म्हणजे सुमारे साडेपाचशे पानांचा समावेश आहे.ॲड. जगदीश शिंगाडे, फिर्यादी डोंगरे यांचे वकील

टॅग्स :मुंबईपुणेपोलिसन्यायालयवकिल