भर समुद्रात वाचवला हार्ट अटॅकचा रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 07:18 AM2022-10-13T07:18:26+5:302022-10-13T07:18:41+5:30

आयआरआय मकरान हे इराणी जहाज मुंबईनजीकच्या समुद्रातून जात होते. अचानक जहाजावरील कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

Heart attack patient saved at sea by indian Navy | भर समुद्रात वाचवला हार्ट अटॅकचा रुग्ण

भर समुद्रात वाचवला हार्ट अटॅकचा रुग्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भर समुद्रात हृदयविकाराचा झटका आल्याने इराणी नौदल कर्मचाऱ्याचे प्राण कंठाशी आले. मात्र, भारतीय नौदलाने वेळीच मदतीचा हात दिल्याने कर्मचाऱ्याचे प्राण वाचले. त्याला नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आयआरआय मकरान हे इराणी जहाज मुंबईनजीकच्या समुद्रातून जात होते. अचानक जहाजावरील कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या नौदलाने भारतीय नौदलाकडे वैद्यकीय मदतीची याचना केली. त्यानुसार नौदलाकडून सकाळी साडेआठच्या सुमारास आयएनएस शिक्रावरून इराणी जहाजावर दोन कर्मचाऱ्यांसह हेलिकॉप्टर पाठवण्यात आले. हृदयविकाराचा झटका आलेल्या कर्मचाऱ्याला एअर लिफ्ट करत नौदलाच्या मुंबईतील आयएनएचएस अस्विनी या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Heart attack patient saved at sea by indian Navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.