शतकमहोत्सवी ‘के दिल अभी भरा नहीं’!

By admin | Published: April 25, 2017 01:46 AM2017-04-25T01:46:42+5:302017-04-25T01:46:42+5:30

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले व रीमा यांनी गाजवलेल्या आणि नव्या संचात मंगेश कदम व लीना भागवत यांनी भूमिका साकारलेल्या

The heart of the centenary celebrations is not filled yet! | शतकमहोत्सवी ‘के दिल अभी भरा नहीं’!

शतकमहोत्सवी ‘के दिल अभी भरा नहीं’!

Next

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले व रीमा यांनी गाजवलेल्या आणि नव्या संचात मंगेश कदम व लीना भागवत यांनी भूमिका साकारलेल्या ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकाने प्रयोगांचे शतक गाठले आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या नाटकाचा शतकमहोत्सवी प्रयोग रंगणार आहे.
वेद प्रॉडक्शन्स या नाट्यसंस्थेचे निर्माते गोपाळ अलगेरी यांनी वर्षभरापूर्वी हे नाटक रंगभूमीवर आणले. त्यात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि अभिनेत्री रीमा यांनी प्रमुख भूमिका रंगवल्या होत्या. मात्र विक्रम गोखले यांच्या आवाजात निर्माण झालेल्या दोषामुळे त्यांनी काही प्रयोगांनंतर या नाटकातून ‘एक्झिट’ घेतली. परिणामी, गोपाळ अलगेरी यांनी मंगेश कदम व लीना भागवत या जोडीला घेऊन हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणले. या नव्या नटसंचाचेही रसिकांनी स्वागत केले. याच प्रयोगांनी आता शंभरीचा पल्ला गाठला आहे. नाट्यरसिकांनी या नाटकाला आतापर्यंत दिलेल्या प्रतिसादाबद्दल कृतज्ञता म्हणून १००व्या प्रयोगात रसिकांना ‘थँक यू’ कार्ड देण्यात येणार आहे. शेखर ढवळीकर लिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित या नाटकाचा शतकमहोत्सवी प्रयोग रविवार, ३० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता विलेपार्लेच्या दीनानाथ नाट्यगृहात रंगणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The heart of the centenary celebrations is not filled yet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.