मुंबई : मुंबई शहरासह उपनगरांत सायंकाळी विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटात पडणाºया पावसाने आता विश्रांती घेतली आहे. मात्र, आता वाढता उकाडा आणि ऊन मुंबईकरांना ‘ताप’दायक ठरू लागले आहे. विशेषत: बुधवारी मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश नोंदविण्यात आले होते. गुरुवारी यात एक अंशाची वाढ झाली असून, कमाल तापमान ३४ अंशांवर पोहोचले आहे. आॅक्टोबर हिटचा वाढता तडाखा कायम राहणार असून, कमाल तापमान ३८ अंशांपर्यंत मजल मारेल, अशी भीती पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारसह शनिवारी मुंबई शहर व उपनगरांत आकाश मोकळे राहील. कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३४, २८ अंशांच्या आसपास राहील. गुरुवारी आर्द्रता ७० ते ८० टक्क्यांच्या आसपास नोंदविण्यात आली आहे.वाढत्या तापमानामुळे घामाघूमवाढते कमाल तापमान आणि आर्द्रता मुंबईकरांचा घाम काढणार आहे. दरम्यान, मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरूच असून, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश येथील काही भागांतून मान्सून गेला आहे.
उकाड्याचा ‘ताप’; पारा ३४ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 4:21 AM