महाराष्ट्र तापला; बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४० ते ४२ अंशाच्या घरात, मुंबईला किंचित दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 02:37 AM2019-03-29T02:37:24+5:302019-03-29T02:37:35+5:30
तापलेल्या मुंबईचा कमाल तापमानाचा पारा ४० अंशाहून ३२ अंश सेल्सिअसवर खाली घसरला आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मुंबई : तापलेल्या मुंबईचा कमाल तापमानाचा पारा ४० अंशाहून ३२ अंश सेल्सिअसवर खाली घसरला आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे राज्यातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४० ते ४२ अंशाच्या घरात नोंदविण्यात येत असल्याने महाराष्ट्र तापला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. तर, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
शुक्रवारसह शनिवारी मुंबईचे कमाल, किमान तापमान अनुक्रमे ३३, २३ अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला.
शहरांचे गुरुवारचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
अहमदनगर ४२.३, अकोला ४१.६, अमरावती ४१.४, औरंगाबाद ४०.१, बीड ४१.७, चंद्रपूर ४०.६, जळगाव ४१.४, जेऊर ४०, मालेगाव ४२, मुंबई ३२.६, नांदेड ४१,नाशिक ४०.४, उस्मानाबाद ४१.२, परभणी ४२.१, सांगली ४०.२, सोलापूर ४२.२, वर्धा ४०, यवतमाळ ४१.
राज्यात आज कोरडे हवामान
२९ मार्च : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
३० मार्च : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहील.
३१ मार्च : मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील.
१ एप्रिल : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.