दुपार तापदायक, सायंकाळी गारव्यासह जलधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 05:56 AM2019-10-13T05:56:32+5:302019-10-13T05:56:38+5:30

संमिश्र वातावरण । पनवेलमध्ये वादळी वाऱ्यामुळे तीन झाडांसह वीजखांब कोसळले, ठाण्यात तासाभरात १७ मिमी पाऊस

Heating in the afternoon, with a hail in the evening | दुपार तापदायक, सायंकाळी गारव्यासह जलधारा

दुपार तापदायक, सायंकाळी गारव्यासह जलधारा

Next

मुंबई : ठाणे आणि नवी मुंबईत शनिवारी सायंकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू असतानाच, मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातही पाऊस सदृश्य वातावरण निर्माण झाले होते. दुपार तापदायक, तर सायंकाळी गारव्यासह जलधारा बरसत असल्याने नागरिकांना संमिश्र वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. शनिवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे पनवेलमध्ये वादळी वाºयामुळे तीन झाडांसह वीजखांब कोसळले, तर ठाण्यातही काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते.'


मुंबई उपनगरात शनिवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत पाऊस पडला नसला, तरी येथील वातावरणात गारवा निर्माण झाल्याचे चित्र होते. दिवसा कडाक्याचे ऊन, सायंकाळी हवेतील गारवा आणि रात्री उशिरा कोसळणाºया जलधारा, अशा संमिश्र वातावरणाचा अनुभव नागरिकांनी घेतला. रात्री साडेआठच्या सुमारास मुलुंड, भांडुपमध्ये पाऊस पडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
दरम्यान भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, उत्तर अरबी समुद्राच्या काही भागातून, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहारच्या आणखी काही भागातून तर पश्चिम बंगालच्या काही भागातून मान्सून परतला आहे.


राज्यात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीसह लगतच्या प्रदेशात पावसाने धुमाकूळ घातला असतानाच मराठवाडा मात्र कोरडाच आहे.
मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला पावसाचा इशारा
मराठवाड्यात गेल्या २४ तासांत काही ठिकाणी तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली असून,कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी १३ आॅक्टोबर रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यासाठी अंदाज
१४ आॅक्टोबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.
१५ आॅक्टोबर : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.
१६ आॅक्टोबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

मुंबईत आकाश
राहणार ढगाळ
मंंबई शहर आणि उपनगरात रविवारसह सोमवारी सायंकाळी आकाश अशंत: ढगाळ राहील. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पनवलेमध्ये पाणी साचले
पनवेल : पनवेलमध्ये संध्याकाळच्या सुमारास वादळी वाºयासह आलेल्या जोरदार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. सायन-पनवेल महामार्गावर या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. सायंकाळी ५.३० च्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने तासाभरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. विजेचा कडकडाट त्यातच जोरदार पावसाने खांदा वसाहत परिसरात सायन-पनवेल महामार्गावर तीन झाडे कोसळली. कळंबोली उड्डाणपुलावर पथदिव्याचे खांब कोसळल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. विजेच्या कडकडाटामुळे अनेक घरांमधील विजेच्या उपकरणांमध्ये बिघाड झाला.

भिवंडीजवळ मुंबई-नाशिक महामार्गावर झाड कोसळले
ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून उन्हामुळे हैराण झालेल्या ठाणेकरांना शनिवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाटात आलेल्या जोरदार पावसाने दिलासा दिला. अवघ्या एका तासात १७.२ मिमी पाऊस झाल्याची नोंद ठाणे महापालिकेकडून घेण्यात आली. यादरम्यान भिवंडीजवळ मुंबई-नाशिक महामार्गावर एक झाड उन्मळून पडल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले. यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला.
ऐन सणासुदीच्या कालावधीत सायंकाळी पडलेल्या या पावसामुळे बाजारपेठेतील ग्राहकांची चांगलीच धावपळ झाली. यामुळे दुकानदारांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. अचानक विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहू लागल्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. ताशी ४० मिमी वारे वाहत असल्याची नोंद ठाणे महापालिकेने घेतली आहे. यादरम्यान सुदैवाने कोठेही जीवितहानी झाली नाही. ठाणे शहर परिसरात एक किरकोळ आगीच्या घटनेसह झाडाची फांदी तुटली तर अन्यही पाच किरकोळ घटना घडल्याचे निदर्शनास आले.

Web Title: Heating in the afternoon, with a hail in the evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.