पशू-पक्ष्यांना उष्माघाताचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 01:00 AM2019-04-10T01:00:24+5:302019-04-10T01:00:30+5:30

श्वसनाचा आजार : वृक्षतोडीमुळे सावलीची जागा हरवल्याचा फटका

Heavy bumps of animal-birds | पशू-पक्ष्यांना उष्माघाताचा त्रास

पशू-पक्ष्यांना उष्माघाताचा त्रास

Next

मुंबई : तापमानाचा पारा सातत्याने चढत असून पशुरूग्णांच्या संख्येही वाढ होत असल्याचे दिसून येते. उष्माघाताचा फटका बसणाऱ्या प्राणी तसेच पक्ष्यांना प्राणीमित्रांकडून डॉक्टरांकडे आणले जात असून अनेक प्राण्यांमध्ये श्वसनाचा त्रासही उद्भवत आहे. वृक्षतोडीमुळे पक्षांची सावलीची हक्काची जागा शहरातून कमी होत असल्याने उन्हात फिरणाऱ्या पक्ष्यांना उष्णतेचा सर्वाधिक त्रास होत आहे. त्याचप्रमाणे शरिरातील पाणी कमी झाल्यानेही अनेकांच्या प्रकृती ढासळताना दिसते.


‘सप्रेडिंग अवेयरनेस आॅन रेप्टाइल्स अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन प्रोग्राम’ (सर्प) संस्थेचे संचालक संतोष शिंदे यांसदर्भात म्हणाले की, उष्माघाताचा त्रास झालेल्यापैकी सर्वात जास्त पक्षी आघाडीवर आहेत. यात घार, पोपट आणि कोकीळा या पक्ष्यांची संख्या जास्त आहेत. तर सर्पामध्ये दोन नाग उष्माघाताला बळी पडले होते. परंतु त्यांच्यावर उपचार करून आता त्यांची प्रकृती स्थिर झाली असून काहींना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. सोसायटीमध्ये सकाळच्यावेळी वाहने धुतली जातात. वाहनांच्या खाली जमिनीवर पाणी साचून राहते, तिथे पाण्याचा गारवा निर्माण होतो. या गारव्याकडे सर्वात जास्त सर्प आकर्षित होतात. बागेमध्ये झाडांना कुंड्याजवळ सर्प थंडाव्यासाठी येतात. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहिले पाहिजे.
‘रॉ’ संस्थेचे संचालक पवन शर्मा यांनी सांगितले की, पोपट, घार, चिमणी, कोकीळा, मैना, कावळा, कबुतर, घुबड इत्यादी पक्षी उष्माघाताची शिकार होऊन उपचारासाठी दाखल झाले होते. धामण, हरणतोळ, नाग, घोणस आणि कवड्या अन्य सर्पावर उन्हाचा तडाखा बसत असून उपचारासाठी दवाखान्यात आणले जात आहेत. उष्माघाताची समस्या ही तात्पुरती योजना करून सुटणार नाही. ज्याप्रमाणे मानवाला सर्व सुख-सुविधांचा उपभोग घेण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे पशु-पक्ष्यांना सुध्दा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांना घराशेजारी धान्य आणि पाण्याची व्यवस्था करावी.

अशी काळजी घ्या...
च्येत्या पावसाळ््यात सर्प आढळण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. सर्प दंश टाळण्यासाठी पुढील उपाय करावे.
च्घराजवळ भंगार, लाकडाची मोली, विटांचा ढीग ठेऊ नये. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. जेणेकरून उंदीर घुशींची संख्या वाढणार नाही आणि त्यामागे सर्प येणार नाही.
च्झोपताना मच्छरदाणी लावून झोपावे. रानातून व उंच गवतातून चालणे टाळावे. सर्पदंश झाला असेल तर इतर औषधांचे प्रयोग करू नये. ‘नाजा २००’ हे औषध सर्प दंशावर वापरू नये.
च् दंश केलेल्या भागावर आवळपट्टी रूमाल किंवा दोर बांधू नये. तसेच जखम धुवू किंवा कापू नये.

Web Title: Heavy bumps of animal-birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.