लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुसळधार पावसाने तलाव क्षेत्रात जोरदार बॅटिंग सुरू ठेवली आहे़ वीकेण्डच्या मुहूर्तावर बरसणाऱ्या सरींनी ४८ तासांतच जलसाठ्यांमध्ये एक लाख ८४ हजार दशलक्ष लीटरने वाढ केली आहे़ त्यामुळे तब्बल ५० दिवसांचा जलसाठा वाढला आहे़ मुंबईकरांसाठी निश्चितच ही खूशखबर आहे़यंदा जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने मुंबईत जोर धरला़ त्यामुळे गेला आठवडा पावसाळीच ठरला आहे़ मुंबईसह तलाव क्षेत्रातही पावसाची जोरदार हजेरी आहे़ गेल्या दोन दिवसांमध्ये तलाव क्षेत्रात दीड महिन्याचा जलसाठा जमा झाला आहे़ त्यामुळे मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन लवकरच मिटण्याची चिन्हे आहेत़ मुंबईला वर्षभर चांगला पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीत तलावांमध्ये पाच लाख ९५ हजार ४४० दशलक्ष लीटर जलसाठा आहे. हा जलसाठा पुढील पाच महिने पुरेल इतका आहे़
तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस
By admin | Published: July 04, 2017 7:34 AM