अतिवृष्टीची नुकसान भरपाई आता मिळणार सुधारित दराने; शासन निर्णय केला जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 07:44 AM2023-03-28T07:44:01+5:302023-03-28T07:44:16+5:30

बहुवार्षिक पिकांना १८,००० प्रतिहेक्टरी भरपाई देण्यात येई, आता २२,५०० रुपये प्रतिहेक्टरी मिळणार आहे.

Heavy rain compensation will now be available at a revised rate; Government decision announced | अतिवृष्टीची नुकसान भरपाई आता मिळणार सुधारित दराने; शासन निर्णय केला जाहीर

अतिवृष्टीची नुकसान भरपाई आता मिळणार सुधारित दराने; शासन निर्णय केला जाहीर

googlenewsNext

मुंबई : राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. महसूल व वन विभागाने सोमवारी शासन निर्णय जारी केला असून, सर्व प्रकारच्या भरपाईचे सुधारित दर जाहीर केले आहेत. अवकाळी व गारपिटीने सुमारे १ लाख ३९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता या सुधारित दराने नुकसान भरपाई मिळणार आहे.

सन २०१५ ते २०२० च्या एसडीआरएफच्या प्रचलित दरानुसार जिराईत पिकांना प्रतिहेक्टरी ६,८०० रुपये भरपाई मिळत होती, आता ८,५०० मिळतील. बागायती पिकांना प्रतिहेक्टरी १३,५०० रूपये भरपाई मिळत होती, सुधारित दराने १७,००० रूपये प्रतिहेक्टरी मिळेल. बहुवार्षिक पिकांना १८,००० प्रतिहेक्टरी भरपाई देण्यात येई, आता २२,५०० रुपये प्रतिहेक्टरी मिळणार आहे.

...असे आहेत नवे दर 

मृत व्यक्ती ४ लाख, अवयव निकामी झाल्यास ७४ हजार ते अडीच लाख रूपये.
जखमी व्यक्ती १६ हजार रूपये, घर पाण्यात बुडाल्यास २५०० रूपये प्रतिकुटुंब.
शेतजमिनीवर गाळ जमा झाल्यास हेक्टरी १८,००० रूपये, जमीन खरडल्यास ४७ हजार.
कोरडवाहू पीक ८,५०० रूपये प्रतिहेक्टर (२ हेक्टर मर्यादा), बागायती पीक १७ हजार प्रतिहेक्टर (२ हेक्टर मर्यादा), 
बहुवार्षिक पीक २२,५०० रूपये प्रतिहेक्टर (२ हेक्टर मर्यादा). दुधाळ म्हैस ७,५०० रुपये प्रतिजनावर, मेंढी ४००० प्रति, बैल ३२,००० प्रति, वासरू २०,००० प्रति, कोेबडी १०० रुपये प्रति. मासेमारी बोट १५,००० प्रति, पक्के घर पडल्यास १ लाख २० हजार प्रतिकुटुंब, कच्चे घर पडल्यास १ लाख ३० हजार प्रतिकुटुंब, घराची पडझड ६,५०० प्रति, झोपडी ८ हजार, गोठा ३००० रूपये मिळणार आहेत.  घोषित केलेल्या नवीन धोरणानुसार मदतीचे वाटप होईल.  

Web Title: Heavy rain compensation will now be available at a revised rate; Government decision announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.