खालापूर, खोपोलीत मुसळधार पाऊस

By admin | Published: July 29, 2014 12:36 AM2014-07-29T00:36:59+5:302014-07-29T00:36:59+5:30

सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने खालापूरसह खोपोलीला चांगलेच झोडपून काढले असून जनजीवन विस्कळीत झाले

Heavy rain in Khalapur and Khopoli | खालापूर, खोपोलीत मुसळधार पाऊस

खालापूर, खोपोलीत मुसळधार पाऊस

Next

खालापूर : सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने खालापूरसह खोपोलीला चांगलेच झोडपून काढले असून जनजीवन विस्कळीत झाले. रविवार सकाळपासून सुरु झालेल्या पाऊस दुसऱ्या दिवशीही कोसळत राहिल्याने सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. खोपोली शहराला मुसळधार पावसाने जलमय केले. रस्त्यावरच्या वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीवरही त्याचा परिणाम जाणवत होता. शहरातील आपत्ती व्यवस्थापनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. भातशेती पाण्याखाली गेली आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
खालापूर तालुक्याच्या ग्रामीण भागासह खोपोली शहराला अक्षरश: झोडपून काढले. गतवर्षी अशाच मुसळधार पावसामुळे खोपोली जलमय झाली होती. याच धर्तीवर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील काटरंग भागातील नाल्याचे पाणी सखल भागात साचले होते तर दुसरीकडे शीळ फाट्यावरील पटेल नगर आणि सह्याद्री माध्यमिक विद्यालय ते जैन मंदिर हा रस्ता दोन फूट पाण्याखाली गेल्याने पायी चालणेही मुश्कील झाले होते. शाळकरी विद्यार्थी आणि पालकांची पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत होत होती. अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला बांधकाम व्यावसायिकांनी गटारे बुजवून टाकल्याने पाणी रस्त्यावर साचत असल्याचे दिसले.
तालुक्यातील वावोशी, चौक, खोपोली येथील जिल्हा परिषद आणि इतर सर्वच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. इंटरनेट सेवाही बंद होती. भातशेती पूर्णत: पाण्याखाली गेली आहे. पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना तहसीलदार दीपक आकडे यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Web Title: Heavy rain in Khalapur and Khopoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.