मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 08:52 PM2018-06-04T20:52:26+5:302018-06-04T20:52:26+5:30
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे
मुंबई: उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसानं दिलासा दिला आहे. ठाणे आणि नवी मुंबईतही सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या अनेक भागांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका हार्बर रेल्वेला बसला आहे. सीवूड्स आणि बेलापूर स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे हार्बरची वाहतूक 40 मिनिटांसाठी विस्कळीत झाली होती.
नवी मुंबईतील पहिल्याच पावसात हार्बर रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा झाला. सीवूड्स-बेलापूर स्थानकांदरम्यान लोकलचा खोळंबा झाला. नवी मुंबईत गेल्या तासाभरापासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक भागीतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. मुंबई आणि ठाण्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. याशिवाय कोकणातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी, देवरुख, राजापूर, सिंधुदुर्ग परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे.