राज्यात पुढचे १२ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 07:08 AM2023-07-18T07:08:57+5:302023-07-18T07:09:37+5:30

राज्यभरात सक्रिय झालेल्या मान्सूनला अधिक पोषक वातावरण

Heavy rain warning for next 12 days in maharashtra | राज्यात पुढचे १२ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात पुढचे १२ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

googlenewsNext

मुंबई : मुंबईसह राज्यभरात सक्रिय झालेल्या मान्सूनला अधिक पोषक वातावरण तयार झाले असून, हवामानात होत असलेल्या उल्लेखनीय बदलामुळे पुढील चार दिवस राज्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

कोकणातील व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात सून, संबंधित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. खान्देश, नाशिक ते सोलापूरपर्यंतच्या १० तसेच मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत पुढील १२ दिवस म्हणजे २७ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यभर सतर्कतेच्या इशारा दिलेला आहे.

ऑरेंज अलर्ट कुठे?
१८ जुलै : रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, पुणे, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली
१९ आणि २० जुलै : ठाणे, पालघर,
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा
■ २१ जुलै : रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली

सतर्कतेच्या सूचना

गेल्या दोन दिवसात पूर्व विदर्भात जोरदार पावसामुळे अनेक भागात नदी, नाल्यांना पूर आले आहेत. ऑरेंज अलर्टमुळे सतर्कच्या सूचना आहेत. काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसासह वादळीवारा व वीज गर्जना होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.

Web Title: Heavy rain warning for next 12 days in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.