Join us

आजही अतिवृष्टीचा इशारा; पुण्यासह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 8:16 AM

ठाणे, पालघर, रायगड, पुणे जिल्ह्यांना रेड अलर्ट

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात पावसाचे तांडव सुरू असतानाच मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने २१ जुलैसाठी ठाणे, पालघर, रायगड, पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असेही आवाहन केले आहे.

गुरुवारी सकाळी ८:३० वाजेता संपलेल्या २४ तासांत मुंबई महानगर प्रदेशात बहुतांश ठिकाणी पावसाने २०० मिलिमीटरचा टप्पा पार केला. पाच दिवसांसाठी जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मराठवाड्यात काही  ठिकाणीही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कुठे रेड अलर्ट २१ जुलै : ठाणे, पालघर, रायगड, पुणेकुठे ऑरेंज अलर्ट २१ जुलै : रत्नागिरी आणि सातारा२२ जुलै : पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा२३, २४ जुलै : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर

    काय होणारn सखल भागात पूर येईल.n रस्ते, रेल्वे, जल आणि हवाई वाहतुकीला फटका बसेल.n जल, वीज पुरवठ्यात अडचणी येतील.n झाडे कोसळण्यासह धोकादायक बांधकामे पडण्याची शक्यता.n दरडी कोसळण्याची भीती n काेकणचा समुद्र खवळलेला राहील. 

टॅग्स :पाऊसपुणेमुंबई