Join us

गुजरात, महाराष्ट्र व गोव्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 5:33 PM

कमी दाबाचे क्षेत्र

 

मुंबई : उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र असून २४ तासांत हे अधिक तीव्र होण्याची व पुढच्या ३-४ दिवसांत पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या ४-५ दिवसांत गुजरात, महाराष्ट्र व गोवा सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

बुधवारी सकाळी साडे आठ वाजता मुंबईत कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे १३, ११.५ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली आहे. सकाळी किंचित कोसळलेल्या पावसाने नंतर मात्र दिवसभर विश्रांती घेतली. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे ऊन्हाचा पत्ता नव्हता. मात्र बुधवारी दुपारी शहर आणि उपनगरात ब-यापैकी ऊनं पडले होते. तरिही ठिकठिकाणी पडझड सुरु च होती. ४ ठिकाणी घरांचा भाग पडला. ८ ठिकाणी झाडे पडली. ७ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.......................शहर १६.७३पूर्व उपनगर २४.२१पश्चिम उपनगर १९.४४......................

टॅग्स :पाऊसमुंबई मान्सून अपडेटमहाराष्ट्रमुंबईहवामान