मुंबई- मुंबईसह उपनगरांत कोसळत असलेल्या पावसानं हाहाकार माजवला आहे. या पावसानं रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसानं अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. विशेष म्हणजे मुंबईहून कोकणात जाणाऱ्या दोन सुपरफास्ट एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. 22119 मुंबई-करमाळी तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.तर 12051 दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द केली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे. तर काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. मांडवी आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस सीएसएमटीऐवजी पनवेलहून सोडण्यात येणार आहेत. अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनानं ट्विटरवरून रद्द झालेल्या आणि अर्ध्या वाटेतूनच परतणाऱ्या गाड्यांची यादी प्रसिद्ध केली आहे.
Mumbai Rain Update: मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका, जनशताब्दी अन् तेजस एक्स्प्रेस रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 12:53 PM