मुंबईसह राज्यात अतिवृष्टी, पावसाची स्थिती काय? देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 04:16 PM2024-07-08T16:16:51+5:302024-07-08T16:17:26+5:30

BJP DCM Devendra Fadnavis News: मुंबईसह राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात माहिती दिली.

heavy rains in the state including mumbai information given by bjp dcm devendra fadnavis | मुंबईसह राज्यात अतिवृष्टी, पावसाची स्थिती काय? देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबईसह राज्यात अतिवृष्टी, पावसाची स्थिती काय? देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

BJP DCM Devendra Fadnavis News: मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आहे. काही ठिकाणी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आले आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवाही ठप्प झाली होती. ती हळूहळू पूर्ववत होत असल्याचे सांगितले जात आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात मुंबईसह राज्यातील पावसाच्या परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुंबईमध्ये जेव्हा अतिवृष्टी आणि हाईटाईड आहे, या दोन्ही एकत्रित येतात. मुंबई हा बेटाचा भाग आहे, त्यामुळे आपल्याला मुंबईचा समुद्रातच त्याचा निचरा आपण करतो. ज्यावेळेस येतो त्याला त्याचा निचरा होऊ शकत नाही, त्यामुळे मुंबईमध्ये पाणी साचण्याची घटना मोठ्या प्रमाणात होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई उपनगर सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या

मुंबई उपनगर सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. कुर्ला स्थानकावरचा रेल्वे ट्रॅक पाण्याखाली होता, आता त्यातील पाणी बऱ्यापैकी काढण्यात आले आहे. काही प्रमाणात किरकोळ प्रमाणात काही ठिकाणी हानी झाल्याचा आपल्या लक्षात येत आहे. मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ठाणे या सगळ्या भागांमध्ये पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थिती आणि एकंदर अतिवृष्टीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून, बाधित झालेली रेल्वे वाहतून हळूहळू पूर्ववत होत आहे. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

Web Title: heavy rains in the state including mumbai information given by bjp dcm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.