लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर: मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, रायगड आणि पालघर या परिसराला रविवारी तुफानी पावसाने झोडपून काढले. सर्वदूर पाऊस झाल्याने धरणांच्या जलसाठ्यात चांगली वाढ नोंदवली गेली, तर रायगड, पालघर जिल्ह्यांत अनेक नद्या-नाल्यांना पूर आला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा झाला आहे. त्यामुळेच महामुंबई परिसरात दांडपट्टा फिरल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
दादर सखल भागात पाणी साचलेदिवसभर मुंबईत पावसाचा जोर कधी कमी, तर कधी जास्त स्वरूपाचा होता. हिंदू कॉलनी, सायन सर्कल, दादर टीटी, गांधी मार्केट परिसरात पाण्याचा निचरा संथ गतीने होत होता. पूर्व उपनगरांतील पोस्टल फॉलनी, कुर्ला रेल्वे स्थानक, गोवंडीतील शिवाजी नगर, चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनी तसेच पश्चिम उपनगरांतील अंधेरी सबवे, बीकेसी येथील लायब्ररी जंक्शन येथे पाणी साचले.
मुंबईकरांचा रविवार उजाडला तोच पावसाने आणि दिवसभर कमी-अधिक जोराने तो सुरूच राहिला. शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा रविवारी ओर वाढल्याचे जाणवले. सुटी असल्याने मुंबईकरांनीही घरात बसूनच फनडे साजरा करणे पसंत केले. रविवारी सायंकाळी सहापर्यंत पूर्व उपनगरांत ११८ मि.मी. पावसाची नोंद झाली. पुढील २४ तासांत मुंबई शहर व उपनगरांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू होती, त्यात किंग सर्कल, दादर टीटी, अंधेरी सब-वे, कांदिवली, वाकोला, कुलां या ठिकाणांचा समावेश आहे. शहरात १, तसेच पूर्व उपनगरांत १ आणि पश्चिम उपनगरांत ६ अशा एकूण ८ ठिकाणी घर आणि भिंतींचा काही भाग पडला.
परळ मध्य रेल्वे विस्कळीतपावसाने शनिवारी ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथलाही चांगलेच झोडपले. ग्रामीण भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. महामार्गासह शहरातील चाहतूक कोंडी डोकेदुखी ठरली. उपनगरी गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने रेल्वेच्या प्रवाशांचे हाल झाले. जिल्हाभरात सरासरी ५१ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असून, कोठेही वित्त व जीवितहानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पनवेलमध्ये जोरदार बॅटिंगनवी मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे रविवारी अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. पनवेल तालुक्यातही जोरदार पाऊस सुरु होता. रविवार असल्याने पांडवकडा धबधबा, आदई धबधबा, गाडेश्वर डॅम परिसराकडे पर्यटकांनी गर्दी केली होती.
पालघरमध्ये नद्या, नाले तुडुंब पालघर जिल्ह्यात रविवारी अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने ठिकठिकाणचे नदी, नाले तुडुंब भरून वाहत होते. जिल्ह्यातील धरण परिसरातही चांगला पाऊस झाला.
रस्त्यावर पाणीठाणे-बेलापूर मार्गावर रविवारी अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे वाहनांना पाण्यातू वाट काढून जावे लागत होते. सानपाडा, महापे, नेरूळ, उरण फाटा येथील भुयारी मार्गामध्ये पाणी साचले होते. शहरातील बहुतांश भुयारी मार्गाचे तलाव झाले होते. पावसानंतर पाण्याचा निचरा होण्यास बराच वेळ गेला. नवी मुंबईतील तुर्भे परिसरात रविवारी तुफान पाऊस झाल्याने तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात पावसाचे पाणी शिरले होते. यावर्षी पहिल्यांदाच पोलिस ठाण्यात पाणी शिरल्याची घटना घडली आहे.