वडखळ : गेले दोन दिवस मुसळधार पावसाने रायगड जिल्हय़ासह पेण तालुक्याला ऐन गणोशोत्सवात झोडपले असून सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर भातशेती पाण्याखाली गेल्याने भातपीकही धोक्याच्या छायेखाली आहे.
गणोशोत्सव सुरु असल्यामुळे सर्वत्न उत्साहाचे वातावरण असताना मुसळधार पावसाने रायगड जिल्हय़ासह पेण तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याने गणोशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात व्यत्यय आला. रायगड जिल्हय़ासह पेण तालुक्यातील घराघरात गणोशोत्सव साजरा केला जातो, परंतु संततधार पाऊस सुरूच असल्याने भक्तांना गणोशदर्शन घेण्यासाठी बाहेर पडता येत नाही. गावातील इतर गणपतींचे दर्शन घेण्यासाठी व बाजारात खरेदीसाठीही भक्तांना बाहेर पडणो अशक्य बनत आहे. एकंदर संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ऐन भातपीक येण्याच्या दिवसातच पावसाने सुरूवात केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. नदी, नाले, ओढे यांना पूर आला असून शेताचे बांध फुटून हे पाणी भातशेतीत घुसून शेती धोक्यात आली आहे. सुरुवातीला लांबणीवर गेलेला पाऊस आणि त्यानंतर पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे करपल्याने दुबार पेरणीचे ओढवलेले संकट तर अतिवृष्टीमुळे झालेले शेतीचे नुकसान तर आता पडत असलेल्या संततधार पावसाने भातशेती अक्षरश: पाणीमय झाली आहे.
ब:याच दिवसांनी पाऊस पडल्याने नागरिक सुखावले असले तरी गणोशभक्तांच्या उत्साहावर मात्र विरजण पडलेले दिसून येत होते. गणोशमंडळांचे गणपती पहाणोही यावेळी नागरिकांना पावसाच्या संततधारेमुळे शक्य झालेले नाही. शिवाय खरेदीवर उदासीनता आल्याने बाजारपेठा मंदावलेल्याच एकंदर दिसून येत होत्या. (वार्ताहर)
संततधार पावसामुळे गणोशभक्तांचा हिरमोड
महाड : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गणोशभक्तांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांचे देखावे पहाण्यासाठीही गणोशभक्तांची गर्दी तुरळक असल्याचे दिसून आले. मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरिक व चाकरमानी फिरकलेच नसल्याचे दिसून आले. सजावट पहाण्यासाठी गणोशभक्तच नसल्याने अनेक सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांनी आपापले देखावे बंद ठेवणोच पसंत केले, त्यामुळे गणोशभक्तांची पूर्ण निराशा झाली.
पावसाचा जोर कायम
रेवदंडा : सलग तिस:या दिवशी पावसाचा जोर कायम होता. सरीवर सरी कोसळत होत्या, त्यातच सोसाटय़ाचा वारा असल्याने अनेक बागेत सुपारीची झाडे पडली. सखल भागात पाणीही साचले आहे. समुद्र खवळला असून मच्छीमारी व्यवसाय ठप्प पडला आहे. पावसामुळे बँका, डाकघर व अन्य शासकीय कार्यालयात व्यवहार थंडावलेला होता. विद्युत पुरवठा खंडित होणा:या प्रकारामुळे चाकरमानी हैराण झाले आहेत.
पनवेलमध्ये पावसाची संततधार
1पनवेल : रविवारबरोबरच सोमवारीही पनवेल परिसरात पावसाने दमदार हजेरी लावत गणरायाच्या आगमनाचे स्वागत केले. गाढी आणि पाताळगंगा नदय़ा दुथडी भरून वाहत होत्याच. त्याचबरोबर सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले, मात्र कुठे पावासामुळे जीवित आणि वित्तहानी झाली नसल्याचे तहसीलदार पवन चांडक यांनी लोकमतला सांगितले.
2गेले काही दिवस विश्रंती घेतलेल्या पावसाने मात्र रविवारी सकाळपासून जोरदार हजेरी लावली. त्यानंतर सोमवारीही तोच जोर राहिला. आज दिवसभर संततधार सुरू असल्याने सखल भागात पाणी साचले होते, त्याचबरोबर शहरातील बावन्न बंगला, सहस्त्रबुध्दे हॉस्पिटल, हरीओम नगर, टपाल नाका, उरण नाका या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. नवीन पनवेल, खांदा वसाहतीत परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. त्याचबरोबर नालेही दुथडी भरून वाहत होते.
3दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने गाढी आणि पाताळगंगा नदीच्या पात्रतील पाणी वाढले . कळंबोली वसाहतीत सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. सिडकोने पावसाच्या पाण्यासाठी काढलेल्या नाल्यातूनही पाणी दुथडी भरून वाहत होते. मुंबई- पुणो, मुंबई- गोवा, एनएच-4बी, पनवेल -सायन त्याचबरोबर द्रुतगती महामार्गावरील वाहतूक संथ झाली होती.
4पावसाचा जोर पाहता तहसीलदार पवन चांडक यांनी सर्व नायब तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी त्याचबरोबर शासकीय अधिका:यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करून त्यामाध्यमातून तालुक्याचा आढावा घेण्यात येत होता.
5देहरंग आणि गाढेश्वर परिसरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर पांडवकडा धबधब्यावरही पोलीस वॉच ठेवून होते. सिडकोच्या होल्डिंग पाँडवर सुरक्षारक्षक नेमण्यात आले होते. एकंदरीत पाऊस असल्याने गणोश मंडळांचे देखावे पाहणा:यांची संख्याही रोडावली.