मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचे दर वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 06:48 IST2019-08-06T01:06:28+5:302019-08-06T06:48:43+5:30
पावसामुळे माल खराब होण्याचे प्रमाण वाढले

मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचे दर वाढले
नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या व्यवहारावरही परिणाम झाला आहे. होलसेल मार्केटमध्ये बाजारभाव वाढले आहेत. पावसामुळे माल खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
बाजारसमितीच्या भाजी मार्केटमध्ये सोमवारी तब्बल ६७५ ट्रक व टेंपोमधून भाजीपाल्याची आवक झाली. शनिवारी १० ते १४ रूपये किलो दराने विकला जाणारा फलॉवरचे दर १५ ते २५ रुपये किलो एवढे झाले आहेत. भेंडीचे दर २० ते ३० रुपयांवरून २५ ते ४५ रुपये किलो झाले आहेत. गवार, घेवडा, काकडी, दुधी भोपळा याचे दरही वाढले आहेत. राज्यातून ८७ ट्रक व ५८८ टेम्पो अशा एकूण ६७५ वाहनांमधून भाजीपाला विक्रीसाठी आला. ग्राहकांची संख्या कमी असल्याने जवळपास २० टक्के मालाची विक्री होऊ शकली नाही, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
होलसेल दर (प्रतिकिलो)
वस्तू ३ ऑगस्ट ५ ऑगस्ट
भेंडी २० ते ३० २५ ते ४४
फ्लॉवर १० ते १४ १५ ते २५
गवार ४० ते ४८ ४० ते ६०
घेवडा २६ ते ३४ ३५ ते ४५
काकडी १३ ते २० १५ ते ३०
कारली १६ ते २० २४ ते २८