Join us

मुंबई अन् उपनगरांत मुसळधार, येत्या दोन तासांत अतिवृष्टीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 7:41 AM

मुंबईसह महाराष्ट्राला मध्यरात्रीपासून मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे.

मुंबई- मुंबईसह महाराष्ट्राला मध्यरात्रीपासून मुसळधार पावसानं झोडपून काढलं. मुंबई, ठाण्यातील उनगरांत कोसळलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं. विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसानं मुंबईसह उपनगरांतील काही भागात दैना उडवली. रात्रीपासूनच जोरदार सरी बरसायला सुरुवात झाल्या होत्या. हवामान खात्याने येत्या दोन तासांत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.अंधेरी, बोरिवली, दादर, प्रभादेवी, वरळी, घाटकोपर, मुलुंड अशा ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे, पालघर या भागातही पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईच्या सायन येथील गांधी नगर मार्केटमध्ये पाणी साचलं. मुंबईच्या हिंदमाता परिसरात पावसामुळे पाणी साचलं आहे. विशेषत: वेगाने वाहणारे वारे या कोसळणाऱ्या मुसळधार पावसात आणखी भर घालत होते. मुलुंड, नाहूर, भांडुप, कांजूर, टागोरनगर, कन्नमवारनगर, घाटकोपर या भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. पश्चिम उपनगरातील बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी ते वांद्रे येथे संततधार पाऊस कोसळत होता. पावसाचा पश्चिम रेल्वेवर कोणताही परिणाम दिसून आला नाही. दरम्यान, जोरदार पाऊस पडल्यानंतरही अनेक सखल भागात पाणी साचल्याचे निदर्शनास आले नाही.

टॅग्स :मुंबईपाऊस