मुंबईत पुढील दोन दिवस कोसळणार जोरदार सरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 05:29 AM2019-07-30T05:29:23+5:302019-07-30T05:29:37+5:30

हवामान विभागाची माहिती; सायंकाळच्या सुमारास पावसाने गाठल्याने झाली दमछाक

Heavy rains will collapse in Mumbai for the next two days | मुंबईत पुढील दोन दिवस कोसळणार जोरदार सरी

मुंबईत पुढील दोन दिवस कोसळणार जोरदार सरी

Next

मुंबई : सोमवारी सकाळसह दुपारी मुंबई शहर आणि उपनगरात विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळी मात्र मुंबईला झोडपले. विशेषत: दक्षिण आणि मध्य मुंबईत सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पावसाचा जोरदार मारा आणि वाहतूककोंडीने मुंबईकरांची दमछाक केल्याचे चित्र होते. दरम्यान, मंगळवारसह बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सांताक्रुझ वेधशाळेत १४.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दोन ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळल्याची घटना घडली. १५ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. तर ३४ ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, २६ जुलैच्या रात्री दहा वाजता विक्रोळी बस आगारासमोरील नाल्यात एक व्यक्ती पडल्याची घटना घडली. अग्निशमन दल, पोलीस, महापालिकेच्या एन. विभागाने घटनास्थळी दाखल होत शोधकार्य सुरू केले. मात्र, नाल्यात पडलेल्या व्यक्तीचा शोध लागला नाही. परिणामी, मध्यरात्री शोधकार्य थांबविण्यात आले. २८ जुलै रोजी सकाळी पुन्हा एकादा शोधकार्य सुरू करण्यात आले. मात्र, पुन्हा काहीच शोध लागला नाही. त्यामुळे दुपारी अडीच वाजता शोधकार्य थांबविण्यात आले.

Web Title: Heavy rains will collapse in Mumbai for the next two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.