मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शुक्रवारी सकाळी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या काही परिसरात पावसाची नोंद झाली आहे. सकाळी दाखल झालेल्या पावसाच्या रिमझिम सरी दुपारपर्यंत काही ठिकाणी हलक्या स्वरूपात कोसळत होत्या. तर किंचित काही ठिकाणी पडलेले तुरळक ऊन वगळता उर्वरित मुंबई गुरुवारप्रमाणे ढगाळच होती. शनिवारीदेखील मुंबईत सर्वसाधारणपणे असेच वातावरण असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.मुंबईकरांची सकाळच पावसाने उजाडली. मुंबईत सर्वदूर ठिकठिकाणी पावसाची नोंद होत होती. रिमझिम सुरू असलेला हा पाऊस मुंबई आणि नवी मुंबईत हजेरी लावत होता. शुक्रवारी पडलेल्या पावसाने मुंबईच्या सकाळच्या वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला होता. तर शुक्रवारी मुंबईचे कमाल तापमान २८.८ तर किमान तापमान २४.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबामुळे कोसळल्या सरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 7:36 AM