राज्यात आठवडाभर पडणार मुसळधार ते अतिमुसळधार सरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 07:32 AM2021-09-06T07:32:06+5:302021-09-06T07:32:14+5:30
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आहे. ६ सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह राज्यभरात ९ सप्टेंबरपर्यंत गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा प्रभाव राहणार असून, ७ आणि ८ सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आहे. ६ सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ७ सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि अकोला या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. मुंबई शहर आणि उपनगरातही पावसाच्या सरी कायम आहेत. सोमवारीही कमी अधिक फरकाने मुंबईत हीच परिस्थिती राहील, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.