बोचऱ्या वाऱ्यांमुळे थंडीची तीव्रता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 06:10 AM2020-01-06T06:10:43+5:302020-01-06T06:10:50+5:30

राज्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान सातत्याने १० अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.

Heavy winds intensified the cold | बोचऱ्या वाऱ्यांमुळे थंडीची तीव्रता वाढली

बोचऱ्या वाऱ्यांमुळे थंडीची तीव्रता वाढली

Next

मुंबई : राज्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान सातत्याने १० अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. समुद्रकिनाºयावरील शहरांचे किमान तापमान १५ ते २० अंश आहे, तर गेल्या ४ दिवसांपासून मुंबईचे किमान तापमानही २० अंशांच्या खाली आले आहे. त्याच वेळी बोचºया वाºयांमुळे मुंबईत थंडीची तीव्रता वाढली आहे. रविवारी मुंबईचे तापमान १७.५ अंश होते. मात्र हळूहळू तापमानात वाढ नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविले गेले आहे.
६ आणि ७ जानेवारी रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान ३०, १८ अंशांच्या आसपास राहील.
>६ जानेवारी । गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
७ जानेवारी । गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
८ जानेवारी । विदर्भात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहील.
९ जानेवारी । विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे १०.१ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे.

Web Title: Heavy winds intensified the cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.