हिरेवाडीत कमी दाबाने वीजपुरवठा
By admin | Published: June 13, 2015 11:21 PM2015-06-13T23:21:52+5:302015-06-13T23:21:52+5:30
कर्जत तालुक्यातील टेंबरे ग्रामपंचायतमध्ये असलेल्या हिरेवाडीत गेल्या दीड महिन्यापासून कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे
नेरळ : कर्जत तालुक्यातील टेंबरे ग्रामपंचायतमध्ये असलेल्या हिरेवाडीत गेल्या दीड महिन्यापासून कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याप्रकरणी कडाव येथील वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
३५० लोकांची वस्ती असलेल्या हिरेवाडीला वीजपुरवठा करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी महावितरण कंपनीने ६३ केव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविले होते. त्याआधी तेथे असलेल्या रोहित्रमधून चांगल्या प्रकारे वीजपुरवठा होत होता. परंतु नव्याने बसविलेल्या वीज रोहित्रमधून सुरु वातीपासून कमी दाबाने वीजपुरवठा होत होता.
तर गेल्या महिन्यापासून अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे, केवल एका फेसअंतर्गत वीज गावात सर्वांना मिळत असल्याने त्याचा दाब कमी झाला आहे. त्याबाबत ग्रामस्थ पंढरीनाथ पिंपरकर यांनी महावितरणचे कडाव येथील शाखा अभियंता मंगल वेढे यांना अनेक वेळा लेखी तक्र ारी दिल्या आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
येथील रोहित्र त्वरित न बदलल्यास पावसाळ्यात हिरेवाडीतील ग्रामस्थांना अंधारात राहावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुक्यातील अनेक दुर्गम वाड्या आजही मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत. पाणीटंचाई, अनियमित वीज पुरवठ्यामुळे परिसरातील ग्रामस्थ त्रस्त आहेत. निवडणूक काळात लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासनांची खैरात वाढण्यात येते. मात्र आजतागायत सोयी सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.