ओएनजीसीचं हेलिकॉप्टर डहाणूजवळ समुद्रात कोसळलं, चार जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 01:07 PM2018-01-13T13:07:18+5:302018-01-13T17:14:13+5:30
नौदल आणि तटरक्षकदलाकडून समुद्रात बचावकार्य सुरु आहे.
मुंबई- जुहू येथून सकाळी 10.20 वाजता उड्डाण केलेलं ओएनजीसीचे पवनहंस हेलिकॉप्टर सकाळी डहाणूजवळील समुद्रात कोसळलं. या हेलिकॉप्टरमधून ओएनजीसीचे ५ कर्मचारी आणि २ पायलट होते. यांपैकी चार जणांचा मृत्यू झाला असून इतर तीन जणांचा शोध सुरु आहे. जुहू येथून ओएनजीसीच्या ऑफशोर डेव्हलपमेंट एरियाकडे (ओडीए) निघालेल्या या हेलिकॉप्टरचा सकाळी एअर ट्राफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. दरम्यान, नौदल आणि तटरक्षकदलाकडून समुद्रात बचावकार्य सुरु आहे. मृतांपैकी एकाची ओळख पटली असून पंकज गर्ग असं या मृत कामगाराचं नाव आहे
#UPDATE Indian Coast Guard recovered one more body. Total death toll rises to 4; Search and rescue operation underway.
— ANI (@ANI) January 13, 2018
हेलिकॉप्टरचा मुंबईपासून 30 नॉटिकल मैलावर गेल्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. साडेदहा वाजेपर्यंत हे हेलिकॉप्टर एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संपर्कात होतं त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. दरम्यान, बेपत्ता झालेल्या सात जणाचं शोधकार्य सुरू झालं आहे. तब्बल साडे तीन तासांच्या शोधकार्यानंतर हे हेलिकॉप्टर डहाणूजवळ सापडलं आहे. दरम्यान, चार जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती मिळते आहे.
#Mumbai: Helicopter with 7 people on board, including ONGC employees, has lost contact with Air Traffic Control (ATC) 30 nautical miles off Mumbai. More details awaited.
— ANI (@ANI) January 13, 2018
#UPDATE The helicopter took off from Juhu at 10.20 am & was scheduled to land at North Field of ONGC at 10.58 but didn't reach there. No contact could be established after 10.30 am. Search underway. #Mumbai
— ANI (@ANI) January 13, 2018
ओएनजीसीच्या डाऊफिन एएस 365 एन3 चॉपर 2 पायलट्स व 5 प्रवाशांना घेऊन निघालं होतं. ओेएनजीसीच्या ७ अधिकाऱ्यांना घेऊन निघालेल्या या हेलिकॉप्टरने जुहू येथून सकाळी १०.२० वाजता उड्डाण केलं. हे हेलिकॉप्टर मुंबईनजीक अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या तळावर १०.५८ वाजता पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र, ते नियोजीत वेळेत न पोहचल्याने ओनेजीसीने इंडियन कोस्ट गार्डला याबद्दलची माहिती दिली. मुंबईपासून समुद्रात ३० नॉटिकल माइल्स इतक्या अंतरावर गेल्यानंतर १०.३० वाजल्यापासून या हेलिकॉप्टरचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क होऊ शकलेला नाही.
दरम्यान, बेपत्ता झालेलं हेलिकॉप्टर ओएनजीसीचंच आहे. कंपनीने करार केल्याने पवनहंस हेलिकॉप्टर पाच ते सहा वर्षांपासून ओएनजीसीसोबत काम करत आहे.
‘नौदल आणि तटरक्षक दल आपलं काम करीत असून त्यांच्या समन्वयासाठी मी मुंबईकडे निघालो आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांच्यासोबत याप्रकरणी चर्चा झाली आहे. त्यांनी यात सहकार्याची भुमिका दाखवली असून नौदल आणि तटरक्षकदलाला यामध्ये पूर्णपणे सहकार्याचे आदेश दिले आहेत, असं केंद्रीय मंत्री धर्मेंद प्रधान यांनी म्हंटलं.
Navy & Coast Guard are on their job. I am also going to Mumbai to coordinate things. I will discuss it with Defense Minister. She is also cooperating & has instructed Navy & Coast Guard to look into the issue extensively:Dharmendra Pradhan on crash of ONGC's Pawan Hans Helicopter pic.twitter.com/XZeBDXehUJ
— ANI (@ANI) January 13, 2018