संदीप प्रधान ल्ल मुंबईराजभवनाच्या पायाशी रुंजी घालणारा सागर... विधान भवनावरील डौलदार सिंहांची राजमुद्रा... घारापुरी लेण्यांचा परिसर याचे विहंगम दर्शन घेण्याची हेलीटुरिझम योजना येत्या आठवडाभरात महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)मार्फत सुरू करण्यात येणार आहे. प्रतिमाणशी आठ ते दहा हजारांत अर्धा तास हेलीकॉप्टरने मुंबई न्याहाळताना ‘आज कल पाँव जमीं पर नहीं पडते मेरे’, असा रोमांचकारी अनुभव मध्यमवर्गीयांनाही घेता येणार आहे.चार ते सहा आसन व्यवस्था असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची हेलीकॉप्टर दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई, मुंबई शहर दर्शन (दक्षिण व उत्तर), घारापुरी (एलिफंटा), घारापुरी हवाई दर्शन आणि लेणीदर्शन तर दक्षिण व उत्तर मुंबई स्थळदर्शन अशा वेगवेगळ््या मार्गांवर ही हेलीटुरिझम योजना राबवली जाणार आहे. दक्षिण मुंबईचे विहंगम दर्शन घेणाऱ्यांना जुहू बीच, रेसकोर्स, हाजीअली दर्गा, राजभवन, म्युझियम, कुलाबा, विधान भवन हेलीकॉप्टरमधून न्याहाळता येईल. उत्तर मुंबईचे दर्शन घेणाऱ्यांना जुहू बीच, पवई तलाव, विहार तलाव, बोरीवलीतील पॅगोडा, मढ बेट, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम, बुद्धीस्ट गुंफा, मढ-मार्वे चौपाटी यांचे दर्शन घडेल. सध्या या योजनेकरिता प्राप्त झालेले दर हे ३० ते ६० मिनिटांकरिता १२ हजार ते २० हजार प्रतिमाणशी आहेत. मात्र हे दर ८ ते १० हजारांपासून १२ ते१२ हजारांपर्यंत कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वर्सोवा येथे वॉटर स्पोर्टसवर्सोवा येथील चौपाटीवर वॉटर स्पोटर््स सुरू करण्याकरिता मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी शेखर चन्ने, पर्यटन संचालक सतीश सोनी आणि आमदार अमित साटम यांनी बुधवारी पाहणी केली. याबाबत शक्याशक्यता अहवाल तयार करण्यात येणार आहे.राज्यातील पर्यटनस्थळे हेलीटुरिझमने जोडणार : मुंबईतील हेलीटुरिझम योजना यशस्वी झाल्यावर राज्यातील विविध पर्यटनस्थळे हेलीटुरिझमने जोडण्यात येणार आहेत. काही उद्योजक व कंपन्यांनी अशी योजना राबवण्यात रस दाखवला आहे. याबाबत तांत्रिक सुसाध्यता अहवाल तयार करण्यात येत आहे.
हेलीटुरिझम आठवडाभरात कार्यान्वित
By admin | Published: February 19, 2015 2:42 AM