हॅलो....प्रेमाला विरोध केल्याने व्यावसायिकाची हत्या
By admin | Published: December 03, 2014 10:35 PM
प्रेमाला विरोध केल्याने व्यावसायिकाची हत्या
प्रेमाला विरोध केल्याने व्यावसायिकाची हत्याकुरारमधील हत्येचे गूढ १२ दिवसांत उलगडलेमुंबई: गेले बारा दिवस कुरार पोलीस एका विचित्र हत्येच्या गुन्ह्याचा तपास करत होते. त्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले असून, त्या हत्येचा उलगडा झाला आहे. अहमदाबाद येथील कापड व्यापार्याचा मृतदेह सापडला असून त्याची हत्या प्रेमाला विरोध केल्यामुळे करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. मकबूल हसन सरदार अली (३०) या आरोपीने ऑगस्ट महिन्यात सादिक अली रसूल अली चारमियाँ या समव्यावसायिक असलेल्या मित्राची दारु पाजून हत्या केली होती. त्याचा मृतदेह त्याने गोरेगाव येथील ओबेरॉय मॉलसमोरच्या नाल्यात टाकून दिला. सादिक घरी न परतल्याने कुटुंबियांनी तो बेपत्ता झाल्याची तक्र ार गोवंडी पोलीस ठाण्यात दिली होती. आरोपी मकबूल अली हा मालाडच्या कुरार गावात राहतो. मृत सादिकची सासुरवाडी गोवंडी येथे होती, त्यामुळे गोवंडीला तो अनेकदा तेथे येत असे. आरोपी मकबूलचे आपल्याच मेहुणीशी प्रेमसंबंध असल्याचे सादिकला समजले, तेव्हा त्याने प्रेमसंबंधला विरोध केला. त्यामुळे मकबूलने सादिकचा काटा काढण्याचे ठरवले. ऑगस्टमध्ये सादिक गोवंडीला आला असता मकबूलने त्याला भेटीच्या निमित्ताने मालाडला बोलावले. त्याला दारु पाजून ब्लेडने त्याची निर्घृण हत्या केली. या हत्येनंतर आरोपी मकबूल हा बैचेन होत होता, त्याने स्वत: कुरार पोलीस ठाण्यात येऊन गुन्ह्याची कबूली दिली होती. मात्र पोलिसांना मृतदेह सापडत नव्हता. गेले बारा दिवस सर्व नाल्यांचा पोलीस शोध घेत होते. बुधवारी दुपारी एक वाजता पीडब्ल्यूडीचे सफाई कर्मचारी ओबेरॉय मॉल येथील नाला साफ करत असताना त्यांना दुर्गंधी आली असता त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि मृत सादिक याचा भाऊ अब्बास अली चारमियाँ यांनी मृतदेहावरील कपड्यांवरुन सादिकचा मृतदेह ओळखला. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. मात्र कपडे आणि खुनाची पद्धत तसेच दोरीने बांधून मृतदेह टाकण्यात आला असल्याने मृतदेहाची ओळख पटली. आरोपी हा एक डिसेंबरपासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे त्याच्यावर हत्येचा गुन्हा यापूर्वीच नोंदवण्यात आल्याची माहिती तपासाधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)