Hello Lead : नगरसेवकांची ५० टक्क्यांहून कमी उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:07 AM2021-04-28T04:07:03+5:302021-04-28T04:07:03+5:30

अतिशय निराशाजनक कामगिरी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोविडपूर्व काळातील अर्थात एप्रिल २०१७ ते मार्च २०२० या कालावधीतील माहितीचा ...

Hello Lead: Less than 50% attendance of corporators | Hello Lead : नगरसेवकांची ५० टक्क्यांहून कमी उपस्थिती

Hello Lead : नगरसेवकांची ५० टक्क्यांहून कमी उपस्थिती

Next

अतिशय निराशाजनक कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोविडपूर्व काळातील अर्थात एप्रिल २०१७ ते मार्च २०२० या कालावधीतील माहितीचा अधिकार वापरून मुंबई महापालिकेतील सर्व नगरसेवक, नामनिर्देशित नगरसेवक आणि बिगर महापालिका सदस्यांच्या सर्व प्रकारच्या उपस्थितीचा आकडेवारीसह ताळेबंद नागरिकायन संशोधन केंद्राने जाहीर केला आहे. त्यानुसार, सर्व नगरसेवकांची आणि नामनिर्देशित तसेच बिगर महापालिका सदस्य यांच्या संपूर्ण उपस्थितीवरून काढलेला ५० टक्क्यांहून कमी उपस्थितीचा आणि त्याच्या टक्केवारीचा तपशील मांडलेला असून, ‘नगरसेवक या लोकप्रनिधीची ५० टक्क्यांहून कमी उपस्थिती ही अतिशय निराशाजनक कामगिरी आहे’ हा निकष काढण्यात आला आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही सगळी उपस्थिती माहिती अधिकाराचे अर्ज करून मिळवलेली आहे. त्याकरता जवळपास हजार रुपये खर्च आलेला आहे. मुंबई महापालिकेचा चिटणीस विभाग सर्व प्रकारच्या बैठकांचे विषय, कार्यक्रम पत्रिका, निर्णय यांचे तपशील वेळोवेळी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर टाकत असते. मात्र उपस्थितीसारखा आवश्यक तपशील संकेतस्थळावर देत नाही. मात्र त्यामुळे ही माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना माहिती अधिकाराच्या माध्यमातून मेहनत, वेळ आणि पैसा द्यावा लागतो. ही सगळी उपस्थिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना माहिती अधिकाराचे अर्ज करायची वेळच येणार नाही आणि महापालिका कर्मचाऱ्यांनाही त्यांची उत्तरे पाठवायची गरज भासणार नाही. त्यामुळे नगरसेवकांच्या उपस्थितीची सगळी आकडेवारी महापालिकेने तत्काळ त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी ही मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे.

------------------

बाजार व उद्यान समिती : उपस्थिती, निवड आणि पद

१ - संजय रामचंद्र तुर्डे यांची २०१७ ते २० या सलग तीन वर्षांत बाजार व उद्यान समितीत ५० टक्क्यांहूनही कमी उपस्थिती आहे.

२- रुक्साना नाझीम सिध्दिकी यांची ० टक्के (२०१८-१९), २५ टक्के (२०१९-२०) उपस्थिती होती.

३ - नादिया मोहसिन शेख यांची ० टक्के (२०१८-१९), २५ टक्के (२०१९-२०) उपस्थिती होती.

४ - रेश्माबानो मोहम्मद हाशीम खान यांची ३८ टक्के (२०१९-२०) उपस्थिती होती.

५ - सुषमा कमलेश राय यांची ३९ टक्के (२०१७-१८) उपस्थिती होती.

६ - वाजिद वाहिद कुरेशी यांची ४४, ५० (२०१८-१९) उपस्थिती होती.

७ - मोहम्मद रफीक मुस्तफा हुसेन शेख यांची ३८ टक्के (२०१९-२०) उपस्थिती होती.

८ - सरिता अजय पाटील यांची ३१ टक्के (२०१८-१९), ३१ टक्के (२०१९-२०) टक्के उपस्थिती होती.

९ - शिवकुमार झा आणि आसावरी पाटील यांची अनुक्रमे ४४, ३१ (२०१९-२०) उपस्थिती होती.

१० - हाजी मोहम्मद हलीम खान यांची ३३ टक्के (२०१७-१८), १९ टक्के (२०१९-२०) टक्के उपस्थिती होती.

११ - जगदीश मवकुनी भैवलपिल यांची २८ टक्के (२०१७-१८), २५टक्के (२०१९-२०) टक्के उपस्थिती होती.

१२ - रुपाली सुरेश आवळे यांची २५ टक्के (२०१८-१९), ३१ टक्के (२०१९-२०) टक्के उपस्थिती होती.

१३ - रेखा बाबासाहेब रामवंशी यांची ५० टक्के (२०१८-१९), ३१ टक्के (२०१९-२०) टक्के उपस्थिती होती.

१४ - गीता संजय सिंघण यांची ५० टक्के (२०१९-२०) उपस्थिती होती.

१५ - तुकाराम (सुरेश) कृष्णा पाटील यांचीही ५० टक्के (२०१८-१९) उपस्थिती होती.

------------------

बेस्ट समिती

१ - यशवंत जाधव स्थायी समिती अध्यक्षपदी असताना २०१८-१९ आणि २०१९-२० या सलग दोन्ही वर्षी बेस्ट समितीत १८ टक्केच उपस्थिती आहे.

२ - सुनील मोहन अहिर यांची २०१८-१९ मध्ये केवळ १५ टक्केच उपस्थिती राहिलेली आहे.

------------------

शिक्षण समिती

१ - संध्या विपुल दोशी यांची अनुक्रमे ४३ आणि २२ टक्केच उपस्थिती होती.

२ - २०१७ ते २० या सलग तीन वर्षात संगीता चंद्रकांत हंडोरे यांची शिक्षण समितीतील उपस्थिती ही ५० टक्क्यांहूनही कमी होती.

------------------

स्थायी समिती

१ - २०१७-१८च्या स्थायी समितीत सुजाता उदेश पाटेकर यांची ४० टक्केच उपस्थिती होती.

२ - २०१९-२०च्या स्थायी समितीत तुकाराम पाटील आणि अरुंधती दुधवडकर यांची अनुक्रमे ४१ आणि ४३ टक्केच उपस्थिती होती.

३ - २०१९-२०च्या स्थायी समितीत जावेद जुनेजा यांची ४६ टक्केच उपस्थिती होती.

------------------

सर्वसाधारण सभा

२०१७ ते २० या सलग तीन वर्षात सर्वसाधारण सभेतील उपस्थिती ५० टक्क्यांहून कमी असलेले भाजपचे सर्वाधिक नगरसेवक आणि अखिल भारतीय सेनेचा एकमेव नगरसेवक आहे.

------------------

वैधानिक समिती

सर्व वैधानिक समित्यांमधील उपस्थिती ५० टक्क्यांहून कमी असलेले भाजपचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. तर २०१७ ते २० या सलग तीन वर्षांत ५० टक्क्यांहून कमी उपस्थिती असलेले सर्वाधिक नगरसेवक काँग्रेसचे आणि बिगर पालिका सदस्य आहेत.

------------------

विशेष समिती

सर्व विशेष समित्यांमधील उपस्थिती ५० टक्क्यांहून कमी असलेले भाजपचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. तर २०१७ ते २० या सलग तीन वर्षांत ५० टक्क्यांहून कमी उपस्थिती असलेले सर्वाधिक नगरसेवक भाजपचे आणि अखिल भारतीय सेनेचा व मनसेचा एकमेव नगरसेवकही आहे.

------------------

प्रभाग समिती

प्रभाग समित्यांमधील उपस्थिती ५० टक्क्यांहून कमी असलेले शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. तर २०१७ ते २० या सलग तीन वर्षांत ५० टक्क्यांहून कमी उपस्थिती असलेले सर्वाधिक नगरसेवक भाजपचे आहेत.

------------------

उपस्थितीचे बंधन

शाळांपासून कार्यालयांपर्यंत प्रत्येकाला किमान काही टक्के तरी उपस्थितीचे बंधन असते. मात्र नगरसेवक या लोकप्रतिनिधीला महापालिकेतील कामकाजात उपस्थितीचे कोणतेही कायदेशीर बंधन नाही. त्यामुळे उपस्थितीचे बंधनच नसेल तर ते करीत असलेल्या कामाला तरी उत्तरदायित्व कसे असेल? असा सवाल केला जात आहे.

------------------

उपस्थिती निराशाजनक

महापालिका अधिनियम १८८८च्या तरतुदींनुसार काही समित्यांचे अध्यक्ष हे इतर समित्यांचे पदसिद्ध सदस्य होतात. मात्र त्या इतर समित्यांमधील त्यांची उपस्थिती अतिशय निराशाजनक असताना केवळ अधिनियमातील तरतुदींनुसार सदर नगरसेवकाला सदस्य म्हणून घेणे कितपत योग्य आहे? असा सवाल केला जात आहे.

------------------

Web Title: Hello Lead: Less than 50% attendance of corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.