गोंदियाचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वांत कमी, तर कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट हा राज्यात सर्वांत अधिक आहे. गेल्या आठवड्यापेक्षा मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी पाच स्तरावर आखणी करण्यात आली आहे. या आठवड्यातही कोल्हापूर अजूनही डेंजर झोनमध्ये आहे. यात कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक म्हणजेच १३.७७ टक्के इतका आहे. त्याखालोखाल रायगड जिल्ह्यामध्ये १२. ७७ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे. तर तिथेच कोल्हापूरमध्ये ऑक्सिजन बेड हे ५४.७८ टक्के भरले आहेत; तर रायगडमध्ये त्या मानाने ऑक्सिजन बेड हे केवळ १४.६ टक्के इतकेच भरलेले आहेत.
मुंबईकरांना आणखी दिलासा
मुंबई आणि उपनगराचा पॉझिटिव्हिटी दर हा ३.७९ टक्के इतका आहे; तर ऑक्सिजन खाटा २३.१५ टक्के इतक्या व्यापल्या आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट हा ४.४० टक्के इतका होता. गेल्या आठवड्यात मुंबई तिसऱ्या टप्प्यातील नियम लागू करण्यात आले होते. मात्र, या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट अजून कमी झाला आहे, परंतु, दुसऱ्या बाजूला कोणतेही नवे नियम लागू कऱण्यात आलेले नाहीत.