हॅलो .. ! मी कोणत्या शाखेसाठी प्रवेश घेऊ ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 06:46 PM2020-05-02T18:46:08+5:302020-05-02T18:46:31+5:30

विद्यार्थ्यांना समुपदेशकांकडून फोन आणि ई मेलवर मिळणार मार्गदर्शन

Hello ..! Which branch should I take admission for? | हॅलो .. ! मी कोणत्या शाखेसाठी प्रवेश घेऊ ?

हॅलो .. ! मी कोणत्या शाखेसाठी प्रवेश घेऊ ?

Next


करिअर मार्गदर्शनासाठी शिक्षण विभागाचा पुढाकार

मुंबई : नुकताच शालेय शिक्षण विभागाकडून कलचाचणी व अभिक्षमता चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना करिअर निवडीसंबंधी योग्य मार्गदर्शन व समुपदेशनाची निकड जाणवत आहे. अशा परिस्थितीत पुण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत राज्यातील प्रत्यके जिल्ह्यात समुपदेशक व मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पश्चिम , उत्तर, दक्षिण आणि मुंबई जिल्ह्यासाठी तब्ब्ल ७१ समुपदेशक आणि मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दहावीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने भूगोलाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी आता केवळ निकालाची वाट पाहत आहेत. मात्र त्याआधी कोणत्या शाखेला जायचे हे ठरविण्यासाठी आपली आवड कशात आहे? आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे या बद्दल शिक्षक , मार्गदर्शक यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन घेत असतात. अनेक विद्यार्थी तर यासाठी बाहेरून काही एप्टीट्यूड परीक्षा ही देतात आणि मगच आपल्याला कोणती शाखा निवडायची आहे यासंबंधी निर्णय घेत असतात. मात्र यंदा राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवरशाळा , शैक्षणिक संस्था बंद असल्याने विद्यार्थ्याना योग्य समुपदेशन मिळणे अवघड झाले आहे. सद्यपरिस्थितीत ऑनलाईन शिक्षण सुरु असताना विद्यार्थ्यांना ऑनलाईन समुपदेशन आणि मार्गदर्शनही मिळणेही आवश्यक आहे. तयासाठी या समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समुपदेशांकचे संपर्क क्रमांक आणि ई मेल आयडी विद्यार्थ्यांना देण्यात आले असून विद्यार्थी व्हाट्सअप, मेल किंवा फोनवरून सल्ला आणि मार्गदर्शन घृ शकणार आहेत.

भूगोलाच्या गुणासंबंधी अद्याप अनिश्चिती
दहावीच्या विद्यार्थ्याचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून भूगोलाच्या पेपरचे गुण  नेमके कसे आणि किती द्यायचे यावर निश्चिती होणार आहे. मात्र अदयाप मंडळाकडून त्या संदर्भात कोणतीही अद्ययावत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत. मंडळाकडून गुणपद्धती निश्चित झाल्यानंतरच निकालाचा अंदाज तरी विद्यार्थ्यांना येऊ शकणार आहे. मात्र सध्या त्याबाबतीत कोणतीच माहिती मंडळाकडून मिळत नसल्याने विद्यार्थी पालक गुणपद्धती लवकर जाहीर करण्याची मागणी करत आहेत

Web Title: Hello ..! Which branch should I take admission for?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.