Join us

शेतकरी आणि विद्यार्थ्यांना तत्काळ मदत करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 5:57 AM

महाराष्ट्रातील शेतकरी आज संकटात असून, त्यांची मुले म्हणजेच विद्यार्थीसुद्धा संकटात आहेत.

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकरी आज संकटात असून, त्यांची मुले म्हणजेच विद्यार्थीसुद्धा संकटात आहेत. शेतकरी आणि विद्यार्थ्यांना या शासनातर्फे येत्या दहा दिवसांत म्हणजेच २५ नोव्हेंबरपर्यंत ठोस मदत तत्काळ जाहीर करण्यात यावी, अन्यथा संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आला. यावेळी प्रसाद पाखले, सुनील नागणे, सुनील मेटे उपस्थित होते.यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील म्हणाले की, आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात शेतकऱ्यांच्या घरांसह ऊस, कापूस, तूर, तांदूळ, भुईमूग, सोयाबीन, द्राक्षे, मोसंबी व इतर फळबागा यांचा समावेश आहे. याबाबत सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणतीच भरीव तरतूद दिलेले नाही, तसेच शासनाकडून वेळेवर पंचनामेसुद्धा झालेले नाहीत. शासनाने केलेली दिरंगाई आणि पीकविमा कंपन्यांनी केलेली फसवणूक यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. त्यामुळे राज्यपालांनी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकºयांना ताबडतोब भरघोस मदत करावी. आम्ही आजच राज्यपालांना भेटून निवेदन देणार असून, या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत असे म्हणाले.यासोबतच शेतकºयांना पीक नुकसान भरपाई म्हणून एकरी रुपये ५० हजार आणि फळबागांना एकरी एक लाख रुपये तत्काळ देण्यात यावेत, जनावरांसाठी चारा छावणी उभारून चारा पुरवावा, शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी.पीकविमा शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करावा, शेतकºयांना नव्याने पीक कर्ज द्यावे आदी मागण्या मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :मराठा क्रांती मोर्चा