Join us

कामाठीपुरातील वेश्यांकडून पूरग्रस्तांना मदत, मुख्यमंत्री सहायता निधीत फंड जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 3:09 PM

पूरग्रस्त परिस्थितीतून सावरण्यासाठी मदकार्य जोरात सुरू आहे. सेलिब्रिटींपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वचजण आपापल्या परीने मदत करत आहेत.

ठळक मुद्देमदतीची भावना सगळ्यांची असते अगदी त्यांचीसुद्धा असते ज्यांचं आयुष्यभर शोषण झालेलं असतं.पूरग्रस्त परिस्थितीतून सावरण्यासाठी मदकार्य जोरात सुरू आहे. सेलिब्रिटींपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वचजण आपापल्या परीने मदत करत आहेत.

मुंबई - सांगली अन् कोल्हापूरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. स्थानिक सरपंचांपासून ते मंत्र्यांपर्यंत, शाळकरी मुलांपासून ते सरकारी नोकरदारांपर्यंत, व्यापाऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत, पंढरपूरपासून ते शिर्डी देवस्थानपर्यंत सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला आहे. सोशल मीडियावरही मित्रपरिवार एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन करत आहे. याकामी मराठी सिनेकलाकारही मागे नाहीत. 

पूरग्रस्त परिस्थितीतून सावरण्यासाठी मदकार्य जोरात सुरू आहे. सेलिब्रिटींपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वचजण आपापल्या परीने मदत करत आहेत. अभिनेता रितेश देशमुख याने 25 लाख रुपयांची मदत दिली आहे. तर, अनेक संस्था संघटनाही पुढाकार घेत आहेत. विशेष म्हणजे, मुंबईतील कामाठीपुरा येथील महिलांनीही मुख्यमत्री सहायता निधीत आपली मदत दिली आहे. 'सिस्टर्स ऑफ कामाठीपुरा' या संस्थेमार्फत हा मदतनिधी दिला आहे. कामाठीपुरातील वेश्या असलेल्या माहिलांनी ही मदत दिली आहे. याबाबत, वेश्या आणि तत्सम पीडितांचे दु:ख मांडणाऱ्या, वेश्या महिलांसाठी समाजकार्य करणाऱ्या समीर गायकवाड यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन माहिती दिली. 

''मदतीची भावना सगळ्यांची असते अगदी त्यांचीसुद्धा असते ज्यांचं आयुष्यभर शोषण झालेलं असतं. एक छोटीशी मदत समाजाने झिडकारलेल्या वेश्यांकडून. सेक्सवर्कर्स भगिनींचा निधी किती रकमेचा आहे हे गौण आहे, त्यांच्या भावना मानवतेच्या अत्युच्च पातळीच्या आहेत हे मात्र नक्की !''

अशी फेसबुकपोस्ट समीर गायकवाड यांनी लिहिली आहे. समीर यांच्या पोस्टवरुन, परिस्थितीने वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या महिलांमध्येही भावनांचा पूर ओसंडून वाहत असतो, केवळ आपण त्या दृष्टीनं त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे, असंच सहजपणे वाटतं. दरम्यान, या महिलांनी किती रक्कम दिली हे माहिती नसले तरी, त्यांची मदतीची भावना ही माणूसकी जिवंत असल्याची साक्ष देतेय एवढं नक्की.  

टॅग्स :मुंबईवेश्याव्यवसायकोल्हापूर पूर