पालिका प्रशासनाच्या मदतीने ८३ वर्षाच्या जेष्ठ नागरिकाला मिळाला अखेर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये बेड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 06:09 PM2020-05-21T18:09:14+5:302020-05-21T18:09:38+5:30
पालिका प्रशासनाच्या मदतीने ८३ वर्षाच्या जेष्ठ नागरिकाला काल रात्री ११.३० वाजता बॉम्बे हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये बेड मिळाला.
मुंबई : पालिका प्रशासनाच्या मदतीने ८३ वर्षाच्या जेष्ठ नागरिकाला काल रात्री ११.३० वाजता बॉम्बे हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये बेड मिळाला. २४ तास उलटल्यानंतर कोविड बाधीत ८३ वर्षाच्या बेडरिटन जेष्ठ नागरिकाला अखेर रुग्णालयात प्रवेश मिळाला.
काल सायंकाळी दादरच्या राम मारुती रोड येथील या जेष्ठ नागरिकाला पालिकेच्या आप्तकालीन विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर व त्यांच्या सहकारी रश्मी लोखंडे यांनी मोलाचे सहकार्य करून पवईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये काल सायंकाळी ६.३० वाजता त्यांच्या कुटुंबियानी दाखल केले. मात्र रुग्णाची अवस्था क्रिटिकल असल्याने येथे त्यांना बेड उपलब्ध झाला नाही. आमच्या कडे आयसीयू बेड उपलब्ध नसल्याने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असे त्यांना काल रात्री ८.30 वाजता सांगण्यात आले. कुटुंबांनी पालिकेशी संपर्क साधला. महेश नार्वेकर यांनी तातडीने दखल घेऊन या जेष्ठ नागरिकाला काल रात्री ११.३० वाजता हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये बेड मिळवून दिला. चांगल्या कामाबद्धल पालिका प्रशासनाचे कौतुक केले पाहिजे असे सांगत या कुटुंबाने महेश नार्वेकर व रेश्मा लोखंडे यांचे मनापासून आभार मानले.