कोविड सेलमुळे पोहोचली ६ हजार पोलिसांपर्यंत मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:07 AM2021-05-21T04:07:05+5:302021-05-21T04:07:05+5:30

वेळीच उपचार मिळाल्यामुळे वाचले प्राण, ते म्हणतात, .... तेव्हा कॉल घेताना आमचेही हात थरथरले कोविड सेलमुळे पोहोचली ...

Help reached 6,000 policemen due to Kovid cell | कोविड सेलमुळे पोहोचली ६ हजार पोलिसांपर्यंत मदत

कोविड सेलमुळे पोहोचली ६ हजार पोलिसांपर्यंत मदत

Next

वेळीच उपचार मिळाल्यामुळे वाचले प्राण,

ते म्हणतात, .... तेव्हा कॉल घेताना आमचेही हात थरथरले

कोविड सेलमुळे पोहोचली ६ हजार पोलिसांपर्यंत मदत

वेळीच उपचार मिळाल्यामुळे वाचले प्राण,

ते म्हणतात, .... तेव्हा कॉल घेताना आमचेही हात थरथरले

मनीषा म्हात्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई पोलिसांची कोरोना चाचणी आणि त्यानंतर उपचार मिळविण्यासाठीची होणारी वणवण थांबविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड हेल्पलाईन कक्षात वर्षभरात ८ हजार पोलिसांचे कॉल खणखणले आहेत. यापैकी ६ हजार पोलिसांपर्यंत मदत पोहोचवली आहे. वेळीच मदत मिळाल्यामुळे अनेक पोलिसांचे प्राण वाचले आहेत.

पहिल्या लाटेत कोरोनाचे सर्वाधिक हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत दर दिवसाला ८० ते १०० ने वाढणारा कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा पोलीस दलाची चिंता वाढविणारा बनला होता. त्यात पोलिसांनाच कोरोनाची तपासणी करण्यासाठी असंख्य अडचणी येत होत्या.

कोरोनाची लक्षणे दिसून येत असलेल्या पोलिसांना रुग्णालयांत उपचारांसाठी दाखल करून घेतले जात नव्हते. त्यामुळे स्वतः जीव धोक्यात घालून कोरोनासंबंधी सर्व प्रकारची कर्तव्ये बजावत असलेल्या पोलीस दलात संतापाचे वातावरण पसरले होते. काही पोलिसांनी आपली व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून वरिष्ठांच्या आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

अखेर तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पोलिसांसाठी स्वतंत्र असा कोविड हेल्पलाईन कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला. गेल्यावर्षी २८ एप्रिलपासून सुरू झालेल्या या कोविड कक्षामध्ये १५ अधिकारी, कर्मचारी ३ शिफ्टमध्ये सेवा बजावत आहेत. त्यांच्या दिमतीला डॉक्टरांचे पथकही आहेत.

पोलिसांसाठीची ही कोविड हेल्पलाइन सुरू होताच सुरुवातीला दिवसाचे ६० ते ७० कॉल येत होते, तर रात्रीच्या सुमारास २५ ते ३० कॉलचा समावेश असे. पोलिसांच्या अडचणी जाणून कक्षाने

रुग्णवाहिकेची मागणी केली. सध्या मुंबई पोलिसांच्या दोन आणि महापालिकेकडून मागवून घेतलेल्या १२ अशा एकूण १४ रुग्णवाहिका तैनात आहेत. प्रत्येक परिमंडळअंतर्गत एक रुग्णवाहिका कार्यरत आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेचा प्रश्न मिटला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही हे कक्ष पुन्हा त्याच जोमाने सेवा बजावत आहेत.

या कक्षाला आतापर्यंत पोलिसांचे तब्बल ८ हजार कॉल आले. यापैकी ६ हजार कोरोनाबाधित पोलीस आणि कर्मचाऱ्यांना वेळीच मदत पोहोचवल्यामुळे त्यांना उपचार मिळाले. यामुळे पोलिसांची उपचारांसाठीची वणवण कमी झाली आहे.

.............

अशी होते मदत...

कोरोना संशयित पोलीस किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा कॉल येताच हेल्पलाईन कक्षातील कर्मचारी त्यांची लक्षणे जाणून घेतात. कोरोना पॉझिटिव्ह असल्याची लक्षणे जाणवल्यास तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपलब्ध खाटांची माहिती घेत, तेथे त्यांना नेण्यासाठी रुग्णवाहिका पाठवून त्यांना रुग्णालयात दाखल करेपर्यंत संबंधित पथक त्यांच्या सतत संपर्कात असते. यासाठी एकाच वेळी ३ पोलीस आणि एक डॉक्टर कार्यरत असतात. संबंधित डॉक्टरांकड़ून सौम्य लक्षण असलेल्यांना होम क्वॉरंटाईन करण्याचा सल्लाही देण्यात येत आहे. अशात एक कॉल आल्यानंतर त्यासाठी ५ ते ६ ठिकाणी कॉल करून परिस्थिती हाताळावी लागते.

.....

.... तेव्हा आमचेही हात थरथरले

जेव्हा घरातील व्यक्ती आजारी पडते तेव्हा खाकीतील आई किंवा बापही हादरतो. पहिल्या लाटेत मिनिटाला खणखणणाऱ्या कॉलला उपचारासाठी अनेकजण रडत होते. एका क्षणाला कॉल उचलताना आमचेही हात थरथरले. मात्र, आम्हाला थांबून चालणार नव्हते. आम्ही त्यांचे समुपदेशन करत परिस्थिती हाताळत होतो, असेही कोविड सेलमध्ये कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक दीपक रायवाड़े यांनी सांगितले.

Web Title: Help reached 6,000 policemen due to Kovid cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.