मृतांच्या नातेवाइकांना १ कोटीची मदत द्या!
By admin | Published: July 6, 2017 07:07 AM2017-07-06T07:07:03+5:302017-07-06T07:07:03+5:30
गोरक्षणाच्या नावाखाली देशात दलित आणि मुस्लिमांवर गंभीर हल्ले होत असून त्यांना रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत आहे.
मुंबई : गोरक्षणाच्या नावाखाली देशात दलित आणि मुस्लिमांवर गंभीर हल्ले होत असून त्यांना रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत आहे. तरी या भ्याड हल्ल्यांत जीव गमावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना सरकारने १ कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करत समाजवादी
पार्टीने बुधवारी आझाद मैदानात धरणे दिले. यावेळी सपाचे आमदार अबु आजमी यांनी केंद्र व राज्य सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले की, केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून दलित आणि मुस्लिमांवरील हल्ल्यांत वाढ झाली आहे. मुळात शेतकऱ्यांवर गाय किंवा बैल विकण्याची वेळ येऊ नये, याची खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना अनुदान देत गाय व बैलांची खरेदी करावी. शिवाय गोरक्षणाच्या नावावर अल्पसंख्यांवर हल्ले करणाऱ्या गोरक्षकांवर कायमस्वरूपी
बंदी घालावी, अशीही मागणी त्यांनी केली.