‘यूट्यूब’च्या मदतीने त्यांनी केला घरफोडीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 06:01 AM2018-03-14T06:01:17+5:302018-03-14T06:01:17+5:30

‘साहब यूट्यूब पे देखा था, तो आसान लगा और चोरी किया’...घरफोडी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विशीतल्या दोघांनी एमआयडीसी पोलिसांना दिलेली ही माहिती आहे.

With the help of 'youtube', they tried to burglar | ‘यूट्यूब’च्या मदतीने त्यांनी केला घरफोडीचा प्रयत्न

‘यूट्यूब’च्या मदतीने त्यांनी केला घरफोडीचा प्रयत्न

Next

- गौरी टेंबकर-कलगुटकर 
मुंबई : ‘साहब यूट्यूब पे देखा था, तो आसान लगा और चोरी किया’...घरफोडी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विशीतल्या दोघांनी एमआयडीसी पोलिसांना दिलेली ही माहिती आहे. इंटरनेटवर बघून सोप्या पद्धतीने घरफोडी कशी करायची, याची माहिती मिळवून, त्यांनी यापूर्वी एक ‘दारूचे दुकान’ फोडले होते. मात्र, दुसºया घरफोडीच्या वेळी ‘कानून के लंबे हाथ’ त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि हा प्रकार उघडकीस आला. झटपट पैसे मिळविण्यासाठी त्यांनी हा शॉर्टकट अवलंबल्याचे पोलीस चौकशीत कबूल केले.
अरमान खान (२०) आणि रईस खान (१८) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे मूळचे उत्तर प्रदेशचे राहणारे असून, सध्या अंबोलीत अपना बाजार, टेप दर्गा परिसरात राहतात. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शाम हरी आयरे आणि त्यांचे पथक रात्रीच्या वेळी अंधेरी परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी जेव्हीएलआरजवळ ते दोघे संशयास्पदरीत्या फिरताना त्यांना आढळले. पोलिसांना पाहून ते त्या ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या रिक्षात जाऊन बसले. हे आयरे यांनी पाहिले आणि त्यांचा संशय बळावला. त्यांनी लगेचच त्या रिक्षाला घेराव घालत, त्या दोघांना ताब्यत घेत त्यांची झडती घेतली. तेव्हा त्यांच्याकडे प्लम्बिंगचा पाना, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड आणि अन्य सामान सापडले.
त्या सामानाबाबत चौकशी केली असता, ‘आम्ही घाटकोपरमध्ये प्लम्बिंगचे काम करून आलोय, ओलाने घरी निघोलो होतो. मात्र, पैसे संपले म्हणून मध्येच उतरलो,’ असे उत्तर त्यांनी दिले. मात्र, त्यांच्या उत्तराने पोलिसांचे समाधान झाले नाही. तेव्हा त्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले. त्या वेळी मात्र, त्या दोघांनी घरफोडी करण्याच्या उद्देशाने जोगेश्वरी परिसरात फिरत असल्याचे कबूल केले.
>यापूर्वी फोडले दारूचे दुकान
‘यूट्यूब’वर चोरी करण्याच्या सोप्या पद्धती बघितल्या आणि त्यानंतर चोरीसाठी आवश्यक सामान खरेदी करून, २२ फेब्रुवारीला जोगेश्वरी पूर्वच्या दुर्गानगरमध्ये त्यांनी ‘मिस्किन बिअर अँड वाइन’शॉप फोडल्याचे कबूल केले. दुकानातील मोबाइल आणि रोकड मिळून साडे अकरा हजारांचा ऐवज त्यांनी पळविला होता.
यूट्यूबच्या मदतीने केलेली ही चोरी यशस्वी झाली. मात्र, फारच कमी रक्कम हाती लागल्याने, दोघांनी पुन्हा घरफोडी करण्याचे ठरवले. त्यासाठी सुरुवातीला केलेल्या चोरीप्रमाणेच सर्व योजना आखली. मात्र, ती फसली. झटपट पैसे मिळविण्यासाठी त्यांनी हा शॉर्टकट अवलंबल्याचे पोलिसांना सांगितले.

Web Title: With the help of 'youtube', they tried to burglar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.