आरोग्यसेविकांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:08 AM2021-05-05T04:08:59+5:302021-05-05T04:08:59+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेले वर्षभर आपण सर्व काेरोनासारख्या भयानक महामारीतून जात आहोत. मुंबईसारख्या ठिकाणी ह्या युद्धात एकूणच ...

A helping hand to health workers | आरोग्यसेविकांना मदतीचा हात

आरोग्यसेविकांना मदतीचा हात

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेले वर्षभर आपण सर्व काेरोनासारख्या भयानक महामारीतून जात आहोत. मुंबईसारख्या ठिकाणी ह्या युद्धात एकूणच पाहता ४०००च्या संख्येने आरोग्यसेविका स्वतःच्या जिवाची, आरोग्याची पर्वा न करता महापालिकेकडून मिळणारा कमी पगार, आरोग्य विमा किंवा पूरक औषधे मिळत नसतानाही खूप महत्त्वाचे कार्य करत आहेत. एखाद्या परिसरातील आरोग्य केंद्रात वॉर्डमधून कोरोना रुग्णाची माहिती मिळाली की त्याला शोधून मग तो दाटीवाटीच्या भागत राहत असलेल्या रुग्णांना शोधून काढून त्यांना हॉस्पिटलमध्ये किंवा कॉविड सेंटरमध्ये जाण्यापर्यंत सर्व काम करत असतात, तर कधी रुग्णांची समजूत काढून त्यांना उपचारासाठी तयार करण्यापर्यंत समुपदेश करण्याचेही काम या सर्व सेविका करतच असतात.

त्यांच्या या कार्याला सलाम म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आणि शिवाय चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक सचिन भिलारे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने गोरेगावमधील आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविकांना स्टीमर, वह्या आणि पौष्टिक खाऊ नुकताच देण्यात आला.

आरोग्यसेविकांशी स्वतः बोलून त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन विचार आणि कृतीतून एक सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या सचिन भिलारे यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन मदत केल्याबद्दल उपस्थित आरोग्यसेविकांनी त्यांचे आभार मानले.

-----------

Web Title: A helping hand to health workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.