मुंबई : ४ आॅगस्ट रोजी मुसळधार पावसात स्वत:चे घर वाहून गेले गेले असून देखील तुलसी पाईप रोडवरील मॅनहोल जवळ ७ तास खडा पहारा देणार्या कांता कालन यांना मदतीचा हात मिळाला आहे. घराचे झालेले नुकसान आणि मुलींच्या पुढील शिक्षणासाठी व्हॅल्यूएबल एड्यूटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड ने कालन यांना १ लाख १0 हजार रु पयांची मदत जाहीर केली आहे.कालन यांनी मुसळधार पावसात पाण्याचा निचरा व्हावा यासाठी मेनहॉलचे झाकण उघडले स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अनेकांचा जीव वाचवला. या पावसात त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी साठविलेले १0 हजार रु पये वाहून गेले. आपले घर पुन्हा कसे उभे करायचे आणि पैशांअभावी मुलींचे शिक्षण कसे करायचे. याची चिंता कालन यांना लागून राहिली होती ही बातमी जेव्हा आम्हाला कळली तेव्हा कालन यांना मदत करायला हवी असे वाटले.कांता यांच्या मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ही मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. कालन यांना इतरांनीही पुढे येऊन मदत करायला हवी असे व्हॅल्यूएबल एड्यूटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड संस्थापक अमेय हेटे यांनी सांगितले.
पहारा देणाऱ्या कांता कालनला मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 1:29 AM