रोजगारासाठी आता हेल्पलाइन

By admin | Published: June 23, 2014 11:12 PM2014-06-23T23:12:15+5:302014-06-23T23:15:08+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम मिळविण्यासाठी नेमके काय करायला पाहिजे हे ग्रामीण भागात अद्याप गरजूंना माहीत नाही.

Helpline now for employment | रोजगारासाठी आता हेल्पलाइन

रोजगारासाठी आता हेल्पलाइन

Next
>जयंत धुळप - अलिबाग
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम मिळविण्यासाठी नेमके काय करायला पाहिजे हे ग्रामीण भागात अद्याप गरजूंना माहीत नाही. या सर्व परिस्थितीत काम उपलब्ध आहे, गरजू मजूर उपलब्ध आहेत तरी केवळ समन्वयाच्या अभावामुळे गरजूंना काम मिळत नसल्याचा अनुभव गांभीर्याने विचारात घेवून, राज्याच्या कोणत्याही गावांतील गरजूंनी आता केवळ टोल-फ्री हेल्पलाइन- 18क्क्2676क्क्1 या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्या गरजूला त्याच्या गावांतच मजुरीचे काम उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यातील कोणत्याही गावांतून या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यावर, गरजू मजुराचा थेट मुंबईत मंत्रलयात संपर्क होईल. तेथील संपर्क प्रमुख गरजूला तत्काळ एक तिकीट क्रमांक देईल. तेथेच याबाबत वर्गवारी केली जाईल. ती माहिती त्याच वेळी संगणक सक्षम प्राधिका:यांकडे पाठवेल. तेथून त्या संबंधित गरजूच्या जिल्हा, प्रांत आणि तहसीलदार स्तरावर कळवून, पुढे त्या गरजूंच्या गावांतच त्यास रोजगार उपलब्ध करुन दिला जाईल, असे हे गतिमान नियोजन करण्यात आले असल्याची माहिती रायगडच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे प्रमुख बाबासाहेब पारधे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. या यंत्रणोत मोबाइलवरुन संपर्क साधल्यास त्यास एसएमएसद्वारे तत्काळ पोचपावती मिळू शकेल. ग्रामपंचायतीने सक्रिय होणो गरजेचे असल्याची अपेक्षा पारधे यांनी व्यक्त केली आहे.
 
सहा तहसीलदारांच्या कार्यक्षेत्रत एकही काम नाही
सद्यस्थितीत जिल्ह्यात पनवेल, खालापूर, उरण, महाड, पोलादपूर व म्हसळा या सहा तालुका तहसीलदारांच्या कार्यक्षेत्रंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एकही काम सुरु नाही. अलिबाग तहसील अंतर्गत 1क् कामांवर 12 मजूर, पेणमध्ये 23 कामांवर 1क्2 मजूर, मुरुडमध्ये एका कामावर 6, कजर्त मध्ये 14 कामांवर 61 मजूर, माणगावमध्ये 3 कामांवर 6, रोहा तालुक्यांत 2 कामांवर 3, तळा तालुक्यांत एका कामावर 2, सुधागड तालुक्यांत 3 कामांवर 3 तर श्रीवर्धन तालुक्यांत 2 कामांवर 8 असे नऊ तहसीलदारांच्या कार्यक्षेत्रंत एकूण 59 कामांवर एकूण 2क्3 मजूर कार्यरत आहेत.
 
आठ गटविकास अधिकारी कार्यक्षेत्रंतही कामे नाहीत
जिल्हा परिषदेच्या पनवेल, कजर्त , उरण, माणगांव, तळा, सुधागड, महाड, पोलादपूर या आठ गट(तालुका) विकास अधिका:यांच्या कार्यक्षेत्रंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एकही काम सुरु नाही परिणामी एकही मजूर कामावर नाही. अलिबाग, पेण, मुरुड, खालापूर, रोहा, म्हसळा व श्रीवर्धन या सात गट(तालुका) विकास अधिका:यांच्या कार्यक्षेत्रंत एकूण 83 कामे सुरु असून त्यावर 617 मजूर कार्यरत आहेत.

Web Title: Helpline now for employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.