Join us

‘विमानतळावर तक्रारीसाठी हेल्पलाइन नंबर हवा’ - सीजीएसआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 4:18 AM

विमान प्रवासादरम्यान अथवा विमानतळावर येणा-या अडचणींसाठी प्रवाशांना कोणाकडेही दाद मागता येत नाही. नियमाकडे बोट दाखवून प्रवाशांना डावलले जाण्याचा अनुभव अनेकांना आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी विमानतळावर एक हेल्पलाइन नंबर आणि हेल्प डेस्क असावा, अशी मागणी कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडियाने (सीजीएसआय) केली आहे.

मुंबई : विमान प्रवासादरम्यान अथवा विमानतळावर येणा-या अडचणींसाठी प्रवाशांना कोणाकडेही दाद मागता येत नाही. नियमाकडे बोट दाखवून प्रवाशांना डावलले जाण्याचा अनुभव अनेकांना आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी विमानतळावर एक हेल्पलाइन नंबर आणि हेल्प डेस्क असावा, अशी मागणी कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडियाने (सीजीएसआय) केली आहे.विमान प्रवास करताना सुरक्षेच्या दृष्टीने अनेक नियमांचे पालन प्रवाशांना करणे बंधनकारक आहे, पण हेच नियम अनेकदा प्रवाशांना जाचक ठरतात. यामुळे अनेक प्रवासी त्रस्त झाले आहेत. नुकत्याच संसदीय समितीने सादर केलेल्या अहवालातही विमान प्रवासातील अडचणी अधोरेखित झाल्याचे ‘सीजीएसआय’चे सचिव डॉ. मनोहर कामत यांनी सांगितले. विमानाच्या तिकिटांचे दर ही प्रवाशांसमोरची सर्वात मोठी समस्या आहे. कारण, हे दर विमान कंपन्या ठरवतात आणि सातत्याने ते वाढतात. तिकीट रद्द केल्यास त्याच्यासाठीही शुल्क आकारले जाते. यातही सुसूत्रता नसते. या प्रवाशांना कुठेही दाद मागता येत नाही. त्यामुळे प्रवाशांसाठी हेल्प डेस्क आणि हेल्पलाइन क्रमांक असावा, अशी मागणी डायरेक्टोरेट जनरल आॅफ सिव्हिल अ‍ॅव्हिएशन (डीजीसीए) यांच्याकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :विमानतळ