हेमा आहुजाची उच्च न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:14 AM2021-01-13T04:14:45+5:302021-01-13T04:14:45+5:30
खटल्यास अनुपस्थित राहण्याची सवलत मिळविण्यासाठी हेमा आहुजाची उच्च न्यायालयात धाव हेमा आहुजाची उच्च न्यायालयात धाव पायल तडवी आत्महत्या प्रकरण ...
खटल्यास अनुपस्थित राहण्याची सवलत मिळविण्यासाठी हेमा आहुजाची उच्च न्यायालयात धाव
हेमा आहुजाची उच्च न्यायालयात धाव
पायल तडवी आत्महत्या प्रकरण : खटल्यास अनुपस्थित राहण्यासाठी मागितली सवलत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेली डॉ. हेमा आहुजा हिने खटल्यास अनुपस्थित राहण्याची सवलत मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
आहुजाने शिक्षण व नोकरीचे कारण पुढे करत आपल्याला खटल्याला उपस्थित राहणे शक्य नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. न्या. अजय गडकरी यांच्या एकसदस्यीय खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. सरकारी वकील ऋतुजा आंबेकर यांनी या याचिकेवर आक्षेप घेतला.
तर, महिन्यातून दोनदा खटल्यास उपस्थिती लावायची आहे. नोकरीचे म्हणाल तर याचिकाकर्ती कोरोनाच्या काळात कर्तव्यावर नव्हती, असे निरीक्षण खुद्द सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. एक डॉक्टर म्हणून तिचे हे प्रथम कर्तव्य होते. त्यामुळे ही मागणी मान्य करण्यास आम्ही बांधील नाही, असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी बुधवारी ठेवली.
टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी पायल तडवी हिने तिच्या वरिष्ठ सहकारी डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. भक्ती मेहर यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून २२ मे २०१९ रोजी कॉलेजच्या होस्टेलमध्ये स्वतःच्या रूममध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली हाेती.
पायलला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आहुजा, खंडेलवाल आणि मेहर यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. सध्या तिघी जामिनावर आहेत. मात्र, खटल्याच्या सुनावणीस या तिघींनी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
..........................