क्लोरोफॉर्मच्या अतिरिक्त डोसमुळे हेमाचा मृत्यू
By Admin | Published: December 16, 2015 02:44 AM2015-12-16T02:44:48+5:302015-12-16T02:44:48+5:30
हेमा उपाध्यायचा मृत्यू क्लोरोफॉर्मचा अतिरिक्त डोस दिल्यामुळे तर हरीश भंबानींचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे या दोघांच्या खुन्यांनी पोलिसांना सांगितले. क्लोरोफॉर्मचा अतिरिक्त
मुंबई : हेमा उपाध्यायचा मृत्यू क्लोरोफॉर्मचा अतिरिक्त डोस दिल्यामुळे तर हरीश भंबानींचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे या दोघांच्या खुन्यांनी पोलिसांना सांगितले. क्लोरोफॉर्मचा अतिरिक्त डोस हेमा आणि भंबानी या दोघांनाही मारेकऱ्यांनी दिला होता. हरीश भंबानी श्वास घेण्यास धडपडत राहिल्यामुळे त्यांना गळा दाबून मारण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दुहेरी खुनातील मुख्य आरोपी विद्याधर राजभर याने त्याच्या वर्कशॉपमध्ये हेमाला बोलावण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. त्याआधीही त्याने दोन वेळा तिला आमिष दाखवून बोलावले होते, परंतु तो झोपडपट्टीत राहत असल्यामुळे तिने तेथे जायला त्याला नकार दिला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्येनंतर मारेकऱ्यांचे धाबे दणाणले व नाकाबंदीमध्ये पकडले जाऊ या भीतीतून त्यांनी मृतदेह कांदिवलीतच टाकले. पश्चिम कांदिवलीतील लालजीपाडा भागातील आपल्या वर्कशॉपमध्ये विद्याधर राजभरने हेमा उपाध्यायला येण्यासाठी आमिष दाखविण्याचा प्रयत्न केला होता म्हणून हा खून नियोजनबद्ध होता. त्यामुळे त्यांनी त्या दोघांना जबरदस्तीने क्लोरोफॉर्म किंवा अन्य उपशामकाचा (सिडेटिव्ह) डोस फारसा विरोध व आवाज न होता ठार मारता येईल या विचाराने दिला, असे समजल्याचे पोलिसांनी सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार हेमाने तो भाग झोपडपट्टीचा असल्यामुळे तेथे जायला त्याआधी नकार दिला होता. हा खून नियोजनबद्ध असल्यामुळे आरोपींना (ते थंड डोक्याने गुन्हे करणारे नसल्यामुळे) आपण नाकेबंदीमध्ये पकडले जाऊ अशी भीती वाटली. त्यामुळे त्यांनी मृतदेह बांधले व डहाणूकरवाडीतील नाल्यात टाकले, असे हा अधिकारी म्हणाला.
टेम्पोचालक विजय राजभरची पत्नी बिंदूने सांगितले की, तो या खुनात सहभागी नाही. परंतु तो त्यात सक्रिय सहभागी होता, असे पोलिसांनी सांगितले. तो जेव्हा दिवसभर परत आला नाही त्यावेळी आम्ही तो बेपत्ता असल्याची तक्रार द्यायचा प्रयत्न केला. नंतर त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे आम्हाला कळले. तो विद्याधर राजभरकडे कामाला नव्हता, परंतु त्याचा टेम्पो तो भाडेतत्त्वावर त्याला द्यायचा. (विशेष प्रतिनिधी)
खून मी केला : विद्याधर राजभरच्या शेजाऱ्याने पोलिसांना सांगितले की, विद्याधरने ज्या दिवशी हे खून झाले त्याच दिवशी माझ्याकडून ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. खून झाल्याचे तुला माहिती आहे का असे मी त्याला विचारल्यावर विद्याधर म्हणाला, हे खून मी केल्याचे सांगून हे प्रकरण शांत झाल्यावर तुमचे पैसे परत करीन, असेही या शेजाऱ्याने सांगितले.