तिचा मृत्यू औषधामुळे नव्हे, शिक्षण विभागाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 05:54 AM2018-08-11T05:54:01+5:302018-08-11T05:55:02+5:30

गोवंडी येथील पालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी सकाळी अचानक मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ लागला.

Her death is not due to medication, education department claims | तिचा मृत्यू औषधामुळे नव्हे, शिक्षण विभागाचा दावा

तिचा मृत्यू औषधामुळे नव्हे, शिक्षण विभागाचा दावा

Next

मुंबई : गोवंडी येथील पालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी सकाळी अचानक मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ लागला. दरम्यान, चांदणी शेख या १२ वर्षीय विद्यार्थिनीचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया आर्यन फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्यांमुळेच विषबाधा होऊन चांदणीचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र तिचा मृत्यू त्या गोळीमुळे झाला नसल्याचा दावा महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे. तसेच या गोळ्यांवर वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णालये यांच्याकडून पुढील सूचना येईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
संजय नगर पालिका शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणाºया चांदणीची पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे २४ जानेवारी रोजी वैद्यकीय चाचणी झाल्याची माहिती येथील वॉडनिहाय वैद्यकीय अधिकाºयांनी शुक्रवारी दिली. या वैद्यकीय चाचणीत चांदणीला कोणत्याही प्रकारच्या गंभीर आजाराचे निदान झाले नव्हते. त्यावेळी चांदणीच्या कानातून पू येत होता. तसेच तिला चष्मा लागल्याचे निदान झाल्याची माहिती समोर आली होती, अशी माहिती शाळा प्रशासनाने दिले. तर चांदणीला दिलेल्या औषधामुळे तिचा मृत्यू झाला नसल्याचा दावा मुंबई महापालिका शिक्षण विभागाने केला आहे. दरम्यान, पालिका शाळांमध्ये वापरात असलेल्या आर्यन फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्यांवर वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णालये यांच्याकडून पुढील सूचना येईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
>दोन दिवसांपासून चांदणी गैरहजर
शाळा प्रशासनाशी यासंदर्भात संपर्क साधला असता शाळेच्या मुख्याध्यापिका सय्यद फराह बानू यांनी सांगितले की, चांदणीसह आम्ही इतरांना सोमवारी ६ आॅगस्ट रोजी ही गोळी दिली होती. त्यानंतर दोन दिवस ती मुलगी शाळेत आली नव्हती. बुधवारी आणि गुरुवारी ती शाळेत आली होती. त्यानंतर शुक्रवारी ती शाळेत आली नाही. शुक्रवारी आम्ही तिला गोळी दिली नव्हती. शिवाय शुक्रवारी कोणत्याही विद्यार्थ्यांना आम्ही शाळेत गोळी किंवा औषध दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
>अहवालानंतर कारवाई
मुलांना दिलेल्या गोळ्यांचे तसेच मध्यान्ह भोजनाचे नमूने आम्ही प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
चांदनी शेखच्या मृत्यूप्रकरणी सध्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून डॉक्टरचे एक पॅनल जे.जे. रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करणार आहे.
त्याच्या अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी दिली. संबंधित शाळेच्या बाधित विद्यार्थ्यांवर राजावाडी आणि शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलीस निरीक्षक सुहास कांबळे याप्रकरणी चौकशी करत आहेत.

Web Title: Her death is not due to medication, education department claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू