येथे कम्पाउंडरनेच दिली रुग्णांना औषधे
By admin | Published: August 22, 2014 11:20 PM2014-08-22T23:20:05+5:302014-08-22T23:20:05+5:30
मीनाताई ठाकरे रंगायतनमध्ये हलवला असून तेथे डॉक्टरांच्या अनुपस्थितीत केसपेपर काढणा:या रुग्णांना कम्पाउंडर औषधे देत आहे.
Next
भिवंडी : पावसाळा सुरू झाल्यापासून भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेचा बाई गुलबाई पेट्रीट (बीजीपी) दवाखाना स्व. मीनाताई ठाकरे रंगायतनमध्ये हलवला असून तेथे डॉक्टरांच्या अनुपस्थितीत केसपेपर काढणा:या रुग्णांना कम्पाउंडर औषधे देत आहे. गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी इंजेक्शनची बाधा होत असल्याच्या घटना घडत असताना मनपाच्या दवाखान्यातील हा प्रकार रुग्णांच्या जीवास धोकादायक बनला आहे.
शहरातील प्रभूआळी येथील बीजीपी दवाखान्याची इमारत पालिकेच्या बांधकाम विभागाने वेळीच दुरुस्त न केल्याने पावसाळ्यात इमारत कोसळण्याच्या भीतीने हा दवाखाना स्व. मीनाताई ठाकरे रंगायतन या नाटय़गृहात सुरू करण्यात आला आहे. या दवाखान्यात डॉ. मिलिंद भोईर हे कार्यरत असून ते आजारी असल्याने शुक्रवारी सकाळपासून तेथे कोणीही डॉक्टर नव्हते. अशा वेळी केसपेपर काढलेल्या रुग्णांना दवाखान्यात कम्पाउंडरचे काम करणा:या सुजा पटेल यांनी दवाखान्यातील औषधे देऊन बाहेरची औषधेदेखील लिहून दिल्याची माहिती सूत्रने दिली.
दवाखान्यात डॉक्टर हजर नसल्याची माहितीदेखील कर्मचा:यांनी वरिष्ठांना कळवलेली नाही. येथे डॉक्टर नसताना कम्पाउंडरकडून परस्पर औषधे व उपचार करण्याच्या घटना अनेक वेळा घडतात, अशी माहिती मिळत असून त्यामुळे रुग्णांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.
या प्रकरणी पालिकेच्या प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. विद्या शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डॉक्टरांच्या गैरहजेरीची माहिती दिली नसल्याचे सांगत कम्पाउंडरला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या घटनेची चौकशी करून रुग्णांच्या जीवाशी खेळणा:या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
च्प्रभूआळी येथील दवाखान्याची इमारत पालिकेने वेळीच दुरुस्त न केल्याने पावसाळ्यात इमारत कोसळण्याच्या भीतीने हा दवाखाना स्व. मीनाताई ठाकरे रंगायतन या नाटय़गृहात सुरू केला आहे.