Join us

इथे आहे गांधीजींसमोरच साकारलेली त्यांची एकमेव शिल्पाकृती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 4:08 AM

जगभर महात्मा गांधी यांचे पुतळे, प्रतिमा आहेत. गोल चष्मा, काठी ही रेखाकृती सुध्दा गांधीजींची खुण सांगण्यासाठी पुरेशी आहे.

 मुंबई : जगभर महात्मा गांधी यांचे पुतळे, प्रतिमा आहेत. गोल चष्मा, काठी ही रेखाकृती सुध्दा गांधीजींची खुण सांगण्यासाठी पुरेशी आहे. मात्र चष्म्याशिवाय असलेले गांधीजींचे एकमेव शिल्प मुंबईत आहे. स्वत: गांधीजी हयात असताना त्यांना ‘मॉडेल’म्हणून समोर ठेऊन व्ही.पी. तथा नानासाहेब करमरकर या विख्यात शिल्पकाराने अल्पावधीत त्यांचे अर्धपुतळा स्वरुपातील शिल्प घडविले. गांधीजी पत्रे वाचत असताना हे शिल्प साकारले गेले. या पुतळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे मान किंचित खाली असून चेहऱ्यावर विचारमग्नता आहे.१९२५ दरम्यानच्या राजकारणातील गांधीजींची अत्यंत व्यग्र जीवनशैली पाहता ही बाब स्वप्नवत वाटते. मात्र क ोलकाता येथे ९४ वर्षांपूर्वी ही घटना प्रत्यक्ष घडली होती. कोलकाता येथे चरखा मोहिमेसाठी गांधीजी गेले होते. करमरकर यांनी मोठ्या प्रयासांनी गांधीजींना शिल्प बनविण्यासाठी राजी केले.आपली शिल्पाकृती टाळण्यासाठी गांधीजींनी घातलेली अट करमरकर यांनी मान्य केली. नानासाहेब करमरकर. त्यांचाही जन्मदिन २ आॅक्टोबर हाच असणे हाही एक योगायोग. दीड फुट उंचीचे गांधीजीचे ते शिल्प मणीभवनमध्ये आहे. या ऐतिहासिक शिल्पाच्या निर्मितीस ९४ वर्षे पूर्ण झाली असून त्याचीही शताब्दीकडे वाटचाल सुरु आहे.

टॅग्स :महात्मा गांधी