Join us

काळबादेवीतील गृहिणीकडून ३ कोटींचे हेरॉइन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:06 AM

ड्रग्जची घाऊक विक्रेती; दोन वर्षांपासून सुरू होता ड्रग्ज विक्रीचा धंदालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काळबादेवीतील एका गृहिणीकडून ३ ...

ड्रग्जची घाऊक विक्रेती; दोन वर्षांपासून सुरू होता ड्रग्ज विक्रीचा धंदा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : काळबादेवीतील एका गृहिणीकडून ३ कोटी ८ लाख १० हजार रुपये किमतीचे १ किलो २७ ग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आले. सरस्वती प्रेमा नायडू (५०) असे तिचे नाव आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मुंबईतील मध्य आणि दक्षिण विभागात ती हेरॉइनची विक्री करत होती. गुरुवारी अमलीपदार्थ विरोधी विभागाच्या (एएनसी) वरळी पथकाने ही कारवाई केली.

वरळी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक चांदे यांना गुरुवारी काळबादेवी परिसरात एक महिला हेरॉइनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार वरळी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सुदर्शन चव्हाण, विवेक खवळे, द्वारका पोटवडे, अशोक चांदे यांनी सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले. तिच्या अंगझडतीत १ किलो २७ ग्रॅम हेरॉइन सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत ३ कोटी ८ लाख आहे.

नायडू ही गृहिणी असून, दक्षिण आणि मध्य मुंबईत हेरॉइन या ड्रग्जचा पुरवठा करणारी घाऊक विक्रेती आहे. स्थानिक न्यायालयाने तिला ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिला ड्रग्ज पुरविणाऱ्यांचा शोध सुरू आहे.

* त्या महिलेकडेही अधिक तपास

एएनसीच्या वरळी पथकाने १ जून रोजी पायधुनीतील ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका महिलेकडून ३४ लाख ५० हजार रुपयांचे हेरॉइन जप्त केले होते. तिच्याकडे याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. तिला सीएसएमटी भागातून अटक करण्यात आली होती.

.... .................................................